Ad Code

Responsive Advertisement

" ऐसा बाळासाहेब होणे नाही"


"ऐसा बाळासाहेब होणे नाही"

          हिंदुत्वाची धगधगती मशाल म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे होते आणि आजचा हिंदुत्व म्हणजे काय याचा विचार करण्याची वेळ उभ्या महाराष्ट्रावर येवून ठेपली आहे,किंबहुना उभा महाराष्ट्र अनुभवला देखील आहे. बाळासाहेब ठाकरे वजनदार नेते,हातवर करेन तर उभा महाराष्ट्र उठेल असे अभिमानाने सांगणारे नेते म्हणजे बाळासाहेब,मुंबईचा आवाज चालू बंद करण्याचा रीमोट कंट्रोल म्हणजे बाळासाहेब,महाराष्ट्राचा ठाण्यावाघ म्हणजे बाळासाहेब आणि याचं बाळासाहेबांच्या विचारला,बाळासाहेबांच्या कर्तुत्वाला तिलांजलि वाहून मोकळे झाले ते म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे. 

बाळासाहेब ठाकरे


         उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम हिंदुत्व सोडून कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस सोबत युती केली आणि इथेच बाळासाहेबांच्या विचारांच नामोहरम झाला असं म्हणायला हरकत नाही. सत्ता नाही मिळाली तरी चालेल पण उभ्या ह्यातीत कॉँग्रेस सोबत युती करणार नाही,हे ठणकावून सांगणारे नेते म्हणजे बाळासाहेब. आज तोच आवाज लुप्त झाला,ठाण्यावाघ काळाच्या पड्याआड दबला गेला. मराठ्यांचा आधार स्तंभ हरवला आणि उद्धव ठाकरे यांनी बाळसाहेबांचे विचार धुळीस मिळवले असे कुतुहलाने म्हणायची वेळ महाराष्ट्रातील शिवसैनिकांवर आणि मराठी माणसांवर आली. भारत देशाचे पंतप्रधान जरी मुंबईत येवून गेले तरी मातोश्रीवर गुडघे टेकायचे,एवढा दरारा बाळसाहेबांचा होता आणि आज बाळासाहेब गेले तेव्हापासून पार होत्याचं नवतं झालं आणि हे उभ्या महाराष्ट्राने बघितले. 

       वास्तविक उद्धव ठाकरे यांना कॉँग्रेस पुढे झुकायची काहीच गरज नव्हती,सत्ता मिळो अथवा न मिळो पण हा उद्धव ठाकरे कुणासमोर झुकणार नाही अशी जिद्द बाळगली असती तर पुढचा राजकारण उद्धव ठाकरेंच्या मुठीत राहिलं असतं,पण नाही,मागच्या दारानं आली काय किंवा पुढच्या दारानं आली काय,फक्त त्यांना सत्ता हवी होती,सत्ता मिळाली परंतु तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं. ठाण्यावाघ गडगडला. सत्तेसाठी विचार धारा कॉँग्रेसच्या दावणीला बांधून सेनेचे वाटोळे करून मोकळे झाले आणि सेनेचे वाटोळे होण्याला फक्त उद्धव ठाकरे हेच एकमेव कारणीभूत आहेत. 

बाळासाहेब ठाकरे


      हिंदुत्वाची मशाल म्हणजे उद्धव ठाकरे होते,पण आता नाही,त्यावेळी होते. आणि ही पदवी उद्धव साहेबांनी धुळीस मिळवली. आजच्या घडीला उद्धव ठाकरे विचारांची धारा मवाळ झाली. हिंदुत्वाची धकधकती मशाल धूसर झाली आणि काही निवडक लोकांनी मिळून ती धार बोचट केली,वेळीच सावधानता बाळगली असती तर आज हीवेळ आलीच असती,पण आपला दबदबा कायम राखण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरेल आणि आता कोणत्यातरी भलत्याचं विचार धारेच्या पक्षा सोबत युती करायला उद्धव ठाकरे निघाले आहेत. आपले विचार कोणते,त्यांचे विचार कोणते याचा तरी विचार करा. सत्ता येते जाते याचा खूप मोठा बाऊं करायची गरज नाही. छत्रपती शिवरायांची शिकवण आहे,आपला स्वाभिमान कुणापुढे गहाण पडता कामा नये,आणि हेच उद्धव ठाकरे विसरलेत. 

      उद्धव ठाकरे साहेब अजून वेळ गेलेली नाही,सत्तेसाठी लाचार होणं सोडा आणि बाळसाहेबांचे विचार घेऊन जनतेत सामील व्हा. सत्ता तुमच्या पायांवर लोटांगण घालेल,तुम्हाला फक्त आणि फक्त बाळसाहेबांचे विचारच तारू शकतात. शिवसेनेला गतवैभव,नवसंजीवणी प्राप्त करायची असेल तर फक्त बाळसाहेबांचे विचार उपयोगी पडू शकतात नाहीतर उद्धव ठाकरेचं काही खैरं नाही,म्हणून म्हणतोय "ऐसा बाळासाहेब होणे नाही".    

  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या