Ad Code

Responsive Advertisement

पालकमंत्री गेले कुणीकडे,जिल्ह्यातील जनता शोधात.....



पालकमंत्री गेले कुणीकडे,
जिल्ह्यातील जनता शोधात.....


गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी कारभार हाती घेतले,घ्यायलाय पाहिजे,यात माझा काहीच विरोध नाही परंतु फडणवीस साहेब कुठं आणि जिल्हा कुठं याचा जरी विचार केला किंवा मुंबई ते गडचिरोली अंतर किती याचा विचार केला तर डोक्यावर हात ठेवल्याशिवाय काहीनाही अशी अवस्था जिल्ह्यातील नागरिकांची आहे.

पालकमंत्री


  • पालकमंत्री आणि जिल्हा


वास्तविक पाहता जो माणूस ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो,त्यांची जिल्ह्यात महिनीयकाठी तरी एक फेरी व्हायला पाहिजे,तसं महिन्यात आठ-दहा फेरी व्हायला पाहिजेत परंतु फडणवीस साहेब मोठे नेते असल्यामुळे त्यांच्या डोक्यावर जास्तच भार राहतो तो काही विषयच नाही,परंतु निदान महिन्यातून एकदा तरी यायला पाहिजे परंतु तसं होईल असं सध्यातरी वाटत नाही,म्हणजे यापेक्षा गडचिरोली जिल्ह्याचे दुर्दैव ते कोणतं. जिल्ह्यातील जनतेचा कैवारी कोण ? असं जर विचारलं तर कोणत्या तरी भविष्य वेत्याची गरज पडल्याशिवाय राहणार नाही.इतकी वाईट परीस्थिति या गडचिरोली जिल्हयावर आलेली आहे,कुंपणच जर शेत खात असेल तर तक्रार कुणाकडे करायची इतकी वाईट अवस्था जिल्ह्यातील जनतेवर आलेली आहे.

पालकमंत्री

  • उदयोग विरहित जिल्हा

गडचिरोली जिल्हा हा उदयोग विरहित जिल्हा म्हणून देशात जिल्ह्याची ओळख आहे म्हणजे जिल्ह्यातील जनता ७०% शेतीचा व्यवसाय करतात,शेती करून आपली आणि आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतीकरीता सिंचनाची सोय म्हणून चामोर्शी तालुक्यात एकमेव धरण आहेत आणि त्या धरणाचा पाणी शेतांपर्यंत येतो परंतु आम्हचा मुख्य पीक भाताचा असल्यामुळे पाणी भरपूर पाहिजे पण शेवटच्या टोकापर्यंत तलावाचा पाणी अजून पर्यंत पोहचला नसून,शेवटच्या गावाला अजूनही तलावाच्या पाण्याची अपेक्षा आहे कारण भातशेती नुकतीच गर्भावस्थेतून निसव्यावर आहे आणि आत्ताच भात पिकाला पाण्याची जास्त गरज आहे पण भातपीक मरण यातना भोगत आहे अशी अवस्था भातपिकाची झालेली आहे म्हणजे भातपीक जर नष्ट झाला तरं शेतकरी हवालदिल झाल्या शिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे. जिल्ह्यात एकही उदयोग नसल्यामुळे बेरोजगाराच्या हाताला काही मिळतं नाही आणि इकडे शेतकऱ्याची शेती मरणाच्या दारात पोहचलेली आहे,म्हणजे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्यामुळे पुढचं जीवन कसं जगायचं किंवा बँकचे घेतलेलं कर्ज कसं परत करायचं ? अशी बिकट अवस्था शेतकऱ्याची झालेली असतांना जिल्ह्याचे पालकमंत्री गैरहजर असतात यापेक्षा मोठ दुर्दैव ते कोणतं अशी अवस्था होऊन गेलेली आहे.

  • तलावाचं पाणी जिथं येत नाही तिथचं भारनियमन लागू आहे

ज्या गावात तलावाचे पाणी येत नाही म्हणून शेतकरी कंटाळून जाऊन मोटार पंपाची शेती करायला सुरुवात केलेला असतांना तिथं आता भारनियमानचं भूत शेतकाऱ्याच्या डोक्यावर बसलं,म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. वास्तविक पाहता ज्या गावाला तलावाचे पाणी पोहचत नाही त्या गावांवर भारनियमन लागू नाही पाहिजे परंतु तिथल्याच शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे,हा खूप गंभीर प्रश्न आहे परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री गैरहजर आहे तर शेतकाऱ्याचे काय होणारं ? असा प्रश्न आहे,त्रास पोटाचा आहे आणि,मलमपटी डोक्याला लावत आहे,अशी परीस्थिति गडचिरोली जिल्ह्याची झालेली आहे.
पालकमंत्री
                                  ( गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली-मूल मार्गावरील रस्त्याचे हे छायाचित्र )


  • जिल्हा एक,समस्या अनेक

गडचिरोली जिल्ह्यात अनेक समस्या आहेत परंतु इथले लोकप्रतिनिधी अजून जागृत झालेले नाहीत ही एक जिल्ह्यातील पहिली समस्या आहे. जिल्ह्यात सिंचनाची सोय नाही,जिल्ह्यातील रस्ते पक्के नाहीत,बेरोजगाराच्या हाताला काम नाही,कामकरी वर्गाला जिल्ह्यात काम नाही,अश्या कितीतरी समस्या जिल्ह्यात आवासून उभ्या असतांना जिल्ह्याला तत्पर असा पालकमंत्री नाही,म्हणजे किती विदारक द्रुष्य असेल या जिल्ह्याच,कल्पना न केलेलीच बरी. जिल्ह्यात उदयोग नाही म्हणून बेरोजगारीची फौज वाढत चाललेली आहे,जिल्ह्यात सिंचनाची सोय नाही म्हणून शेती कमकुवत होत गेलेली आहे,जिल्ह्यात रस्ते धड नाहीत म्हणून कितीतरी ग्रामीण भागांतील गरोदर मातांना खातेवार न्यावे लागते,ही अवस्था जिल्ह्यातील जनतेची आहे आणि कामकरी वर्गाला जिल्ह्यात रोजगार नाही म्हणून कितीतरी ग्रामीण भागांतील आपल्या मायाबहिणी कुटूंबाचा उदारनिर्वाह करता यावा म्हणून बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन वनवन भटकतात किंबहुना दुसऱ्या राज्यात जाऊन काम करतात म्हणजे किती भयानक परीस्थिति या जिल्ह्याची असेल याचा विचार करा.


  • जिल्ह्याला पालकमंत्री नकोच

जिल्ह्यातील जनता समस्येला तोंड देत आपल्या जिवाची घसरलेली गाडी सरकारी योजनेच्या माध्यमातून रुळावर आणू पाहतोय पण जिल्ह्याचे पालकमंत्रीच गैरहजर राहत असतील तर जिल्ह्याला पालकमंत्री नसलेला बरा असा सुर जनतेत उमटत आहे आणि हे खोटं नाही सत्य आहे. आता सांगा एकाच व्यक्तीकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेल तर ते काय दिवे लावणार हे जनतेला माहीतच आहे,फडणवीस साहेबांकडे नागपूर,वर्धा,अमरावती,अकोला,भंडारा आणि गडचिरोली असे ६ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद फडणवीस साहेबांकडे आहेत,माझी राज्य सरकारला एकच विनंती आहे,जसं मुख्यमंत्री पद आहे तसंच एक संपूर्ण महाराष्ट्राचा पालकमंत्रीपद निर्माण करावं आणि त्या पदाच कार्यभार फडणवीस साहेबांकडे सोपवाव ही एक शेवटची विनंती.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या