Ad Code

Responsive Advertisement

झप झप चाललेत नाजुक पाय

 

 झप झप चाललेत नाजुक पाय 

आधीच्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल एवढीच जबाबदारी होती परंतु आज जग बदलला,तसा स्त्रीयांमध्ये मोकळोकता निर्माण झाली आणि बरेचशी प्रगती होऊन आजच्या स्त्रिया स्वावलंबी होऊन जगाला दाखवून दिल्या की,हम भी कुछ कम नही आणि हे सत्य आहे. जमाण्यानुसार बदल व्हायलाच पाहिजे होता आणि तो झाला. 

स्त्री


  • मुलगी शिकली प्रगती झाली 

शिक्षण क्षेत्रात गगन भरारी घेत स्त्रियांनी प्रगती साधली हा मुख्य कारण आहे. शिक्षणामुळे आजची स्त्री स्वताच्या पायांवर उभी आहे याचा सार्थ अभिमान आहे. स्त्री ही तिहेरी भूमिका चांगल्या प्रकारे सांभाळून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्यापासून तर रोजगार पर्यंत उंच भरारी घेत स्वताचा नाव लौकिक केलं आणि स्त्री ही एक अबला नसून ती रणरागिनी आहे हे सिद्ध करून दाखिवलं. म्हतवाच म्हणजे चूल आणि मूल या घोषवाक्यावर मर्यादित न राहता स्वताच कर्तुत्व सिद्ध करीत जगात आपली ओळख निर्माण करुण दाखवली आणि इतकी प्रगती शिक्षणाच्या भरोश्यावर झाली. जर स्त्री शिकलीच नसती तर प्रगती अशक्य तर होतीच परंतु तिला समाजात जीवन जगणं देखील अशक्य होऊन गेलं असतं. शिक्षण वाघिणीचं दूध आहे असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं आणि शिक्षणामुळेच स्त्री ही वाघिन झाली आहे,हे सत्य कुणीही नकारू शकत नाही,म्हणून शिक्षण काळाची गरज आहे. 

स्त्री


  • स्त्री संसार आणि रोजगार 

स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे,हे अगदी बरोबर आहे. घराला घरपण हा स्त्रीमुळे टिकून आहे,ज्या घरात स्त्री नाही त्या घरात थोडसं डोकावून बघा म्हणजे सहज लक्षात येते. आजची स्त्री शिक्षणाच्या भरोशयावर एवढी प्रगती केली,स्वताचा संसार सांभाळून नौकरी वर्गात आणि व्यवसायात स्वताचा दबदबा निर्माण करीत आपल्या नाजुक पायाला धीर देत स्वताला सावरण्याचा प्रयत्न केला आणि पाय सावरीत स्वताच्या पायांवर उभी झाली,ही सर्वात अभिमानास्पद बाब आहे. स्त्री ने उत्तम रित्या संसाराची जबाबदारी पेलून आदर्श निर्माण केला आहे. ज्या समाजात संसाराची जबाबदारी आहे,त्या समाजाला भिकेची डोहाळो कधीच लागणार नाहीत हे मी ठामपणे सांगू इच्छितो . उत्तम रित्या संसार सांभाळीत नौकरी क्षेत्रात सुद्धा आपला चाणाक्ष बुद्धीचा वापर करून आपला टेबल उत्तम रित्या सांभाळून पुरुषांवर मात केलेली आहे. नौकरी क्षेत्रात कलेक्टर पासून तर साध्या शिपाई पदापर्यंत आपली जबाबदारी चोखपणे सांभाळत एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे. 

  • स्त्री आणि बचत गट 

शहरी भागापाटोपाट ग्रामीण भागात सुद्धा स्त्रिया बचत गटात उतूंग भरारी घेत आर्थिक प्रगती साध्य करीत देशाला मजबूत करण्याचा प्रयत्न केली,तेही उत्तम रित्या. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागांतील स्त्री सुद्धा महत्वाचा कणा बनून बँकिंक व्यवहार चांगल्या प्रकारे हाताळत आहे. आज प्रत्येक खेड्यापाड्यात महिला बचत गटाची स्थापना करून चोख व्यवहाराच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत सामील होत आहेत. जि स्त्री चूल आणि मूल सांभाळत होती ती अभागी महिला आज बँकेत जाऊन आपला व्यहवार चोख सांभाळीत आहेत आणि पुरुषाच्या बचत गटापेक्षा महिलांचे बचत गट सक्षम करून आर्थिक प्रगती साधलेली आहे,बचत गटाच्या माध्यमातून भारतात कितीतरी महिला आपला रोजगारनिर्माण केला आहे. 

आणखी वाचा : बहुजनांची कन्या घेऊ पाहतेय गगन भरारी

  • स्त्री आणि शिक्षण 

शिक्षण क्षेत्रात सुद्धा पुरुषांपेक्षा महिला कितीतरी पटीने समोर आहेत. शिक्षणात प्रगती साधून महत्वाच्या पदांपर्यंत मजल मारत स्त्री ने आपला दबदबा निर्माण केला आहे आणि तेही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून. मुलगी शिकली प्रगती झाली,याप्रमाणे स्त्री शिक्षणामुळे आत्मनिर्भर बनली आणि म्हणूनच उत्तम रित्या चूल आणि मूल सांभाळून तिने संसार सुद्धा उत्तम रित्या सांभाळला त्या नंतर शिक्षणामुळे योग्य पद्धतीने नौकरी सांभाळत आहे. कलेक्टर पासून शिपाई पदांपर्यंत आणि शिक्षणामुळे उत्तम पणे स्वताचा व्यवसाय सुद्धा सांभाळतांना तिचा नाजुक पाऊल नव्या दिशांकडे वळतांना दिसतो आहे. नवनवीन कार्य करण्याची आवड आणि जिद्ध ही स्त्री कडे आहे आणि याच कार्यामुळे एक स्त्री स्वताचा कर्तुत्व सिद्ध करण्यास पात्र ठरली आहे. जि स्त्री चूल आणि मूल सांभाळत होती ती आज हवाई जहाज,विमान चालवितांना दिसते आहे.

स्त्री


आणि महत्वाचा म्हणजे देशाचं राष्ट्रपति पद सुद्धा सांभाळीत आहे. शिक्षण क्षेत्रात आज मुली कितीतरी पटीने मुलांपेक्षा सरस आहेत. माध्यमिक शाळांत परीक्षे पासून ते u.p.s.c. पर्यंत अशी अनेक उदाहरण देखत स्त्री पुरुषांच्या बरोबरीने कार्य करतांना दिसते आहे म्हणजे विचार करा चूल आणि मूल सांभाळणारी एक स्त्री आज कितीतरी पद्धतीने जिद्ध आणि चिकाटी यांच्या भरोश्यावर संसारात,नौकरीत आणि व्यवसायात आपला नाजुक पायाने प्रवेश करून यश संपादन केले हे यावरून सिद्ध होते.         



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या