Ad Code

Responsive Advertisement

कुठं नेवून ठेवलाय,महाराष्ट्र माझा



कुठं नेवून ठेवलाय,महाराष्ट्र माझा

      छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र,गर्जा महाराष्ट्र माझा असं आपण अभिमानाने सांगतो,छाती ठोकपणे सांगायलाच पाहिजे कारण छत्रपतीचा महाराष्ट्र म्हटल्यावर निधडी छाती गर्वाने,अभिमानाने फुगते यात दुमत नाही.

       महाराष्ट्रामध्ये काल (म्हणजे) विजयादशमीच्या दिवशी शिवसेनेचेच दोन-दोन मेळावे,म्हणजे छाती अभिमानाने फुगणारच. विजायदशमीच्या दिवशी अंदाजे ५ वाजताच्या दरम्यान मी सन्मानिय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी (ऑफिसात) बसलो होतो,माझी अचानक लक्ष टी. व्हि. कडे गेली आणि बातमी वाचली सर्वप्रथम मला हसू आला,पण बातमी अशी येत होती,शिवाजी पार्कवर राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचा मेळावा आणि आझाद मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांचा दसरा मेळावा आणि तेच-तेच बातमी. उद्धव ठाकरेच्या दसरा मेळाव्याला शिवसैनिक हजर होत आहे आणि दुसरी बातमी एकनाथ शिंदेच्या मेळाव्याला शिवसैनिक हजर होत आहे,म्हणजे किती केविलवाणा प्रयत्न.


महाराष्ट्र


  • दोन नेत्यांचा दसरा मेळावा

     दिवस एकच,पक्ष एकच मात्र ठिकाण दोन,नेते अनेक आणि दोन्ही नेते आपआपली प्रतिष्ठा पनाला लावलेली,निमित्य फक्त दसरा मेळावा परंतु आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ बाकी दुसरं काही नाही. सामान्य माणसाला जीवन जगतांना महागाईच्या काळात किती हालअपेष्ठा सहन कराव्या लागत नाही,पोटाची खळगी भरवण्यासाठी किती यातना सहन कराव्या लागत आहेत यांचा अंदाज नाही,उद्धव ठाकरेला माहीत आहे आणि एकनाथ शिंदेलाही माहीत आहे,त्यांचा फक्त दसरा मेळावा चांगल्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे हा एकमेव उद्देश,जनतेचे काही देणं घेणं नाही.

     दसरा मेळाव्याला जे शिवसैनिक म्हणून मिरवत होते,ते मुळात शिवसैनिक नव्हतेच,ते फक्त किरायाचे लोक होते. शिवसैनिक आहेत हा दिखावा होता आणि हे सांगायला भविष्य वेत्याची गरज पडणार नाही. दसरा मेळावा हा फक्त या दोन नेत्यांचे अस्तित्व दाखवण्याची पद्धत होती. सामान्य जनतेला याचा काहीच सोयरसूतक नाही आणि कधी असणारही नाही,एकमेकांचे उकाडे काढण्यापुरता मर्यादित असणारा हा दसरा मेळावा होता,याचा सामान्य जनतेला काही सोयरसूतक नाही,एवढं मात्र नाही.
 
महाराष्ट्र

  • दोन्ही नेत्याचे-संभाषन


     उद्धव ठाकरे मेळाव्याला जे लोक उपस्थित होते ते शिवसैनिक हे मी आधीच संगीतलो,मेळावा शिवसेनेचा आणि हल्ला भाजपावर. औलादी लक्षणाची ही पार्टी आहे जिथं जातील तिथं भांडण लावायची ही त्यांची संस्कृति,जरांगे पाटलांचे त्यांनी अभिनंदन केले,कोर्टातील न्यायाधीशाची गंमत सांगितली,आमदार अपात्रता मुद्दा उपस्थित करून न्यायदेवतेवरच शंका उपस्थित केली,आम्हच सरकार आले तर उलटे टांगू असे अनेक उदाहरण देत आरोप करीत होते.

     एकनाथ शिंदे शिवरायांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार म्हणजे देणार,सरकार असतांना खूप महापाप केलेत,एकनाथ शिंदेंना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला पण मीच त्यांचा टांगा उलटा करून टाकलं. मी जिकडे-जिकडे जातो तिथले लोक खुश असतात. मुंबईला अंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा देणार म्हणजे मुंबई तोडण्याचा प्रश्नच नाही. अशा अनेक गोष्टी सांगून दसरा मेळावा गाजवला,असो


  • बाळासहेबांचा विचारांचा वारसा


    दोन्ही सभास्थळी असं मोठं फोटो बाळसाहेबांचा झळकत होता हे उभ्या महाराष्ट्रन बघितल परंतु बाळसाहेबांचा विचार,बाळसाहेबांचा वारसा जपण्याचा केविलवाणा प्रयत्न होता,हे दिसून येत होते.

     बाळसाहेबांचे विचार नाही उद्धव ठाकरेनी जपले आणि नाही एकनाथ शिंदेनी जपले,हा फक्त केविलवाणा प्रयत्न होता. बाळासाहेब हिंदुत्वाचा गजर करणारे नेते होते,मराठी अस्मिता जपणारे लढवय्य व मुरब्बी राजकारणी होते. उद्धव ठाकरे यांनी कितीही कांगावा केला तरी बाळासाहेबांचे जे विचार होते त्याला जपू शकणार नाही कारण त्यांनी हिंदुत्वच जपलं नाही हे उभ्या महाराष्ट्रानी बघितले आहे आणि एकनाथ शिंदे कितीही वल्गना केले तरी बाळासाहेबाची जि मराठी अस्मिता आहे ती जनतेसमोर आणू शकणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेषा आहे,हा राजकारणाचा नुसता देखावा आहे आणि ते फक्त खुर्ची साठी.



महाराष्ट्र



  • छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र


      छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे त्याला कुणीही वेगळं करू शकणार नाही,हे काळ्या दगडावरची रेषा आहे आणि कुणी वेगळ करण्याचा प्रयत्न केला तर तो जीवंत राहणार नाही,एवढं मात्र सत्य आहे. रयतेच राज्य अस्तित्वात आले पाहिजे ही छत्रपती शिवरायांची भूमिका होती. आम्हचचं सरकार आलं पाहिजे आणि आम्हीच राज्यकर्ते झालो पाहिजेत ही आजच्या राज्यकर्त्यांची भूमिका राहणार आहे. गरीब जनतेच रक्त पेवून आम्ही बलाढ्य झालो पाहिजे हिच यांची नीती असेल,शाळा बंद झाली तरी चालेल परंतु दारूची दुकान जीवंत राहली पाहिजे ही मूळ संकल्पना राज्यातील सरकारची आहे. बियर पिणाऱ्यांची संख्या कमी का होत आहे ? हे शोधण्यासाठी सरकार समिति नेमण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे,समजून घ्या किती कर्तव्य दक्ष राजकारणी महाराष्ट्रात आहे,म्हणून कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझं,अशी म्हणायची वेळ जनतेवर आलेली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या