Ad Code

Responsive Advertisement

उडाला भडका आरक्षणाचा

 

उडाला भडका आरक्षणाचा 

महाराष्ट्रात अनेक जातींचे लोक वास्तव्यास असून प्रत्येकाला आपआपल्या जातीचे,धर्माचे सार्थ अभिमान आहे आणि असायलाच पाहिजे. ह्याच्यात काहीही गैर नाही आणि आता महाराष्ट्रात रान पेटतोय तो म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा. आरक्षण हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मिळायलाच पाहिजे परंतु मराठा समाजाणं जो जन आंदोलन उभा केलाय तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळविणारच या उद्देशाने मराठा समाजाचे नेते मा. मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाने उभा महाराष्ट्र डोक्यावर घेऊन आजच्या घडीला महाराष्ट्र सरकारची झोप उडवून टाकली आणि आंदोलन असंच व्हायला पाहिजे आणि यालाच आंदोलन म्हणत्यात मग तो कोणत्याही जातीचा असो किंवा धर्माचा असो परंतु आंदोलन हा सरकारची झोप उडविणाराच पाहिजे,असं माझं ठाम मत आहे. 

आरक्षण


  • सरकार आणि मराठा समाज 

वास्तविक द्रुश्य जर डोळ्यासमोर ठेवून विचार केला तर मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. तसं मराठा समाजाने सरकारवर दडपण लादण्याचा प्रयत्न केला आणि चार पाऊल मागे घेत महाराष्ट्र सरकारने,आरक्षण दयायचे कबूल केले आणि मराठा समाजाकडून तशी सहानभूती मिळवून आरक्षणाच्या मुद्यावर एक महिन्याचा अवधि मागून घेतला. जिथं महाराष्ट्र सरकारने ३० दिवसांची मुदत मागितली तेव्हा मराठा समाजाने १० दिवस अधिकचे देवून ४० दिवसांची मुदत देवून मोकळे झाले. 

मराठा समाजाच्या आरक्षणावर महाराष्ट्र सरकारने फारसे गांभीर्य न दाखवता वेळ मरून नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि हे वास्तविक सत्य आजच्या घडिला महाराष्ट्र सरकार ही नाकारू शकत नाही. जन्मोजन्मी टिकणारा आरक्षण देवू अशी बतावणी करून वेळ मरून नेला. मराठा समाजाने सरकारच्या पोकळे आश्वासनावर विश्वास ठेवला अन तिथचं मराठा समाजाची फसगत झाली. 

  • स्वस्त बसेल तो मराठा कसला 

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने वेळ मरून नेन्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. हे त्यांच्या लक्षात आलं होतं परंतु कुठतरी विश्वास नावाचा शब्द जीवंत आहे. म्हणून मराठा समाजाने महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवला परंतु सरकार म्हणजे लबाड लांडगा यावर कुणीही विश्वास ठेवू नये. 



मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी मा. मनोज जरांगे पाटलाच्या रूपाने धकधकती मशाला घेऊन नव्या उमेदेनी,नव्या आत्मविश्वासाने पुन्हा सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी जन आंदोलन यशस्वी रित्या उभे करून दाखविले. आरक्षणासाठी मराठा समाजाचे जथ्ये च्या जथ्ये रस्त्यावर उतरून महाराष्ट्र सरकार विषयी द्वेषाची भावना प्रकट करत असंतोष व्यक्त केला. आरक्षणाविषयी मराठा समाजाची एकी घडवून आणत मनोज जरांगे नावाच्या वादळाने उभ्या महाराष्ट्रात रान पेटवायला सुरुवात केली आणि आजच्या घडिला आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा समाजाने उभा केलेला जनआंदोलन यशस्वी होण्याच्या मार्गावर दिसत आहे,खरचं आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाने जो आंदोलन उभा केलाय तो व्याख्यान जोग आहे. 

आणखी वाचा :पालकमंत्री गेले कुणीकडे,जिल्ह्यातील जनता शोधात....

  • सरकार विरोधात असंतोषाचा भडका उडाला 

आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाचा भडका उडायला सुरुवात झाली,असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्याची पहिली ठिणगी उडालिय ते म्हणजे बीड शहरात. एकाच दिवशी सहा ठिकाणी जाळपोळ होणं ही साधी गोष्ट नाही. उशिरा का होईना परंतु महाराष्ट्र सरकारने आतातरी मराठा समाजाविषयी सहानभूती दाखवत आरक्षण जाहोर करावं. 

आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज पेटून उठलाय याचा महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि मागे पुढे असा भडका उडू नये याचा सारासार विचार करून यावर मार्ग काढावा नाही तर असंतोषाचा भडका आणखी जास्त उडल्याशीवाय राहणार नाही,हे मात्र सत्य आहे. 

आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज पेटून उठलाय आणि तो पेटलेला भडका शांत होण्याच्या मार्गावर दिसत नाही,हे ओळखून सरकारने अतितातडीने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा कारण हे वेळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची नसून ठोस कृती घडणे अति आवश्यक आहे. आज बीड येथे घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे परंतु महाराष्ट्र सरकारच्या वेळकाढूपणामुळे घडलेला प्रसंग आहे आणि याला कारणीभूत महाराष्ट्र सरकार आहे. 

आरक्षण


  • आमदार,खासदार की चे राजीनामे 

आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाने रान पेठवणं सुरू केलयं आणि त्यांच्या समाजातील पदाधिकाऱ्यांना आव्हान केलंय की तुम्हाला मराठा समाजा बदल कळवळ असेल तर तुम्हच्या खासदारकीचा राजीनामा दया आणि मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी व्हा. पुन्हा निवडणुकीत भरघोष मताने निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो अशी शपथ कार्यकर्त्यांनी दिली. खासदार आणि आता आमदाराने राजीनामा द्यावं अशी ताकीद देत महाराष्ट्र सरकारवर तासोरे ओढले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या