Ad Code

Responsive Advertisement

राज ठाकरे-मराठी बाणा जपणारा नेता



राज ठाकरे-मराठी बाणा जपणारा नेता

उभ्या महाराष्ट्रात मराठी बाणा जपणारा,मराठी माणसांचा आवाज बुलंद करणारा,मराठीचा लढवय्य नेता,म्हणजे राज ठाकरे यांचे नाव डोळ्यासमोर येते. मराठी माणसावर अन्याय होत असेल तर मुग गिळून गप्प बसणारा म्हणजे तो राज ठाकरे नव्हे. सत्ता असो अथवा नसो परंतु संबंध महाराष्ट्रात अन्यायाला वाचा फोडणारा नेता,म्हणजे राज ठाकरे.





राज ठाकरे आणि मराठी बाणा

मराठी माणसाला स्वाभिमानाने जीवन जगता आलं पाहिजे,असे हिंदूहृदय सन्माननीय बाळासाहेब म्हणायचे आणि बाळसाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन,त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आज राज ठाकरे मराठी बाणा जपणारा नेता राज ठाकरे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रात नौकरी करायची असेल तर माझा महाराष्ट्रीय माणूस नौकरी केला पाहिजे हे त्यांचे ब्रीद वाक्य,मराठी मानसाविषयी असलेली कळवळ प्रतकर्षाने जाणवते परप्रांतीय लोकांचे लोंढे महाराष्ट्रात येता कामा नये ही त्यांची रोक-ठोक भूमिका आणि कोणताही निर्णय होतांना ते कुणाच्या दबावाला मिक घालत नाही,हाच करारी बाणा उभ्या आयुष्यात राज ठाकरेंनी जपला आणि हिच त्यांची आयुष्याची शिदोरी असं म्हणायला काहीच हरकत नाही. एकदा पत्रकारांनी प्रश्न विचारला,राज साहेब तुम्हच्या मराठीची व्याख्या काय ? राज ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिला,छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर ज्यांच्या तोंडातून आपसूकच जय हा शब्द निघतो,तिच मराठी भाषेची व्याख्या आहे.

मराठी भाषेचा बोलबाला,विधान भवनात गाजला

उद्धव ठाकरे सोबत फारकत घेतल्या नंतर राज ठाकरे महाराष्ट्र नव निर्माण सेनेची स्थापना करून २००९ साली १३ आमदार महाराष्ट्र विधानसभेत पोहचले आणि आमदार पदाची शपथ घेतांना समाजवादी पक्षाचे आमदार मा. अबू अजमी यांनी हिन्दी भाषेत शपथ घेत असतांना मनसे आमदार स्व. रमेश वांजळे हा महाराष्ट्राचा विधान भवन आहे इथे मराठी भाषेतच शपथ घेतल्या गेली पाहिजे म्हणून अबू अजमींच माईक खेचून घेतला आणि आपला मराठीबाणा दाखवून सभागृह दणाणून सोडला,रमेश वांजळेनी बडतर्फ केल्या गेला,तो विषय वेगळा सांगायचा उद्देश इतकाच की राज ठाकरेंनी किती मराठी बाणा जपलाय यावरून लक्षात येते.



आंदोलन आणि राज ठाकरे

महाराष्ट्रात,महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जेवढे आंदोलन झाले,त्यापैकी सर्वात जास्त आंदोलन मराठी माणसाच्या हिता साठी झाले,हे सांगायला कोणत्या भविष्य वेत्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रात सर्वात जास्त खटले असणार नेता म्हणजे राज ठाकरे अशी त्यांची ओळख आहे. परप्रांतीय लोकांचे लोंढे महाराष्ट्रात येवू नये याकरिता आक्रमक भूमिका घेणारा नेता म्हणजे राज ठाकरे. मराठी माणसांवर अन्याय होता कामा नये ही त्यांची आग्रही भूमिका असायची,जे बोललं तेच करून दाखविणार अशी त्यांची ख्याती,रोकठोक आणि स्पष्टपणा बोलणं हिच त्यांची वैशिष्ट.



मैदान गाजविणे अशी ओळख असणारा नेता,राज ठाकरे

   राज ठकरेंची सभा म्हटलं तर अफाट गर्दी हा एक सामहिक समीकरण होऊन गेलं,राज ठाकरेच्या सभेची जेवढी उत्सुकता असायची तेवढी कोणत्याच नेत्याच्या सभेची सभेची नसायची. राज ठाकरेची सभा लोक आवर्जून एकायला जातात,एवढा मैदान गाजविण्यात राज ठाकरे तरबेज,उत्कृष्ट वक्ता अशी उभ्या महाराष्ट्रात आजही त्यांची ओळख आहे,बऱ्याच नेत्यांच्या सभेला लोक किरायाने न्यावे लागते परंतु स्वखर्चाने ज्यांचा भाषण एकायला लोक जातात तो म्हणजे राज ठाकरे,दमदार आवाज,उत्कृष्ट भाषण शैलीच्या जोरावर अफाट गर्दी खेचून आणणारा नेता अशी राज ठाकरे यांची ओळख. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे आमदार जरी निवडून येत नसतील परंतु राज ठाकरेंचा दबदबा मात्र कायम आणि आज पर्यंत त्यांनी कोणत्याही पक्षा सोबत युती केलेली नाही हे त्यांचे वैशिष्ट.


मनसेचे आंदोलन आणि सरकारवर दडपण

   राज ठाकरे जेव्हा-जेव्हा आंदोलनाची तयारी दर्शवतात तेव्हा-तेव्हा मात्र महाराष्ट्र सरकारवर धसका घेतल्याशिवाय राहत नाही. मनसेच्या आंदोलनात कधी तोंड-फोळ होईल यांचा मात्र अंदाज राहत नाही,सांगून समजत नसेल तर मनसे नितीचावापर करून सरकारवर दडपण आणण्याचा हा एकमेव उद्देश राज ठाकरेंचा असतो आणि सरकार त्याला बळी पडतो,यात राज ठाकरेची काय चूक. हमारे मांगे पुरी करो,असा याचा अर्थ असतो,मग तो आंदोलन मराठी माणसांकरीता असो किंवा परप्रांतीय विरोधात असो,परंतु राज ठाकरे नावाचा वादळ महाराष्ट्रात घोंघावतो आणि राहणार यात दुमत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या