Ad Code

Responsive Advertisement

आरक्षणाची रनधूमाळी ओ. बी. सी. समाज झोपेतून जागे व्हा,रमेश चौखूंडेची विनंती



आरक्षणाची रनधूमाळी ओ. बी. सी. समाज झोपेतून जागे व्हा,रमेश चौखूंडेची विनंती..

आरक्षणाची मागणी रास्त आहे. भारतीय राज्यघटनेच्या आधारांवर प्रत्येकाला आरक्षणं हवं आहे आणि तो मिळायलच पाहिजे,यात दुमत नाही परंतु सरकारने आरक्षणामुळे कुणावर अन्याय करू नये आणि कुणावर अन्याय झालाच तर त्याबदल आवाज उठवायलच पाहिजे,मग मराठा असो किंवा ओबीसी असो. आरक्षण हा आपला अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे.

आरक्षण


  • मराठा समाज आणि एकोपा

मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर रान पेठणं सुरू झालाय. आरक्षणाची धकधकती मशाल होऊन तमाम मराठा आंदोलन करून सरकारला सळो की पळो करून सोडलंय राज्य सरकारची झोप उडालिय असं यावेळच्या आंदोलकांनी सिद्ध करून दाखवलिय आणि उभा महाराष्ट्र बघतोय,मराठा समाजाची धकधकती मशाल. मराठा समाजान जि आंदोलन उभे केलीय ती खरच व्याख्यान जोग आहे,त्यांची जिद्ध,त्यांची एकीची भावना या आंदोलनावरून लक्षात येते. रस्त्यांवर उतरायचं असेल तर एकोप्याने आणि मनात जिद्ध घेऊनच उतरावं लागतं,तेव्हाच कुठं आंदोलन यशस्वी होतं,सरकारला दम आला पाहिजे,सरकारला घाम फुटला पाहिजे अशा पद्धतीचं आंदोलन पाहिजे आणि ते त्यांनी करून दाखवलं.

  • मराठा समाजाची मागणी

मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यांवर जो रान पेटवणं सुरू केलंय ते योग्य आहे,तो त्यांचा अधिकार आहे परंतु आरक्षणाची मागणी करतांना महाराष्ट्रात वास्तव्यास असणारी अनेक जाती आहेत,त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घेणं महत्वाचं आहे. ओबीसी समाजामधून त्यांनी जो आरक्षणाचा मुद्दा रेटून धरलंय तो माझ्या मते चुकीचा आहे,मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मागणं हा चुकीचा आहे. मराठा समाजानं आरक्षण जरूर मागावं आम्हची काहीच अडचण नाही परंतु तो आरक्षण तुम्ही स्वतंत्र मागा ओबीसी कोट्यातून नाही,याचा अर्थ असा होतोय तुम्ही ओबीसी कोट्यातून आरक्षण मागून,ओबीसी वर अन्याय करताय हे प्रथम लक्षात घ्या.

आरक्षण



  • ओबीसी बंधावंनो आतातरी जागे व्हा

मराठा समाजाने आरक्षणाविषयी जो रान पेटवणं सुरू केलयं याला ओबीसी समाजाची काहीच हरकत नाही परंतु ओबीसी कोट्यातून जर सरकार मराठ्यानं आरक्षण देत असेल तर सरकार ओबीसी बांधवांवर अन्याय करतोय हे ओबीसी समाजाने आधी समजून घ्यायला पाहिजे आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण देत असतील तर ओबीसी समाजाने सरकार विरोधात आवाज उठविला पाहिजे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची दाद मागायला पाहिजे मग तो शांती च्या मार्गानं असो किंवा क्रांतीच्या मार्गाने असो.

माझी ओबीसी बांधवांना एकच विनंती आहे,आरक्षणाचा मुद्दा फार गंभीर मुद्दा आहे,त्याला हलक्यावर घेऊ नका,आधी हे समजून घ्या. ओबीसी समाजावर सरकारने आधीच अन्याय केलेला आहे,आधीच सावध व्हा आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सर्वप्रथम दाद मगायला शिका,ओबीसी समाज,मराठा समाजाच्या तुलनेत कितीतरी पटीने साधा भोळा आहे आणि परीस्थितीने सुद्धा कमजोर आहे,मराठ्यांच्या तुलनेत ओबीसी समाज कितीतरी कमजोर आहे,हे आधी लक्षात घ्या.


आपल्या करिता नाही परंतु आपल्या समोरच्या पिढीला किती धोकादायक आहे,याचा अभ्यास करा म्हणजे नीट समजून घ्या,तेव्हां तुमच्या लक्षात येईल. सरकारी नौकरिचा जरी विचार केला तरी पण मराठा समाज आज ही ओबीसी समाजाच्या किती तरी पटीने पुढं आहे,हे प्रथम लक्षात घ्या. म्हणून माझी ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे की,आपल्यावर अन्याय होऊ देऊ नका आणि समजा अन्याय झालाच तर सरकार विरोधात आवाज उठवायची तयारी ठेवा जेणेकरून सरकारला आपल्या समोर नतमस्तक होता आला पाहिजे.

आरक्षण



  • सरकार आणि आरक्षण

मराठा समाजान सरकारला वेढीस धरण्याचा प्रयत्न करीत आहे,तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांना मिळायलाच पाहिजे,त्याला ओबीसी समाजाची काहीच हरकत नाही परंतु मराठ्यांना आरक्षण दयायचा असेल तर सरकारने खुशाल दयावा परंतु ओबीसी समाजाच्या केसाला धक्का लागणार नाही याची सर्वप्रथम खबरदारी घ्यावी,जेणेकरून ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये. ओबीसी समाजावर अन्याय करण्याचा सरकारने प्रयत्न करू नये,उलट ओबीसी समाजाचं जे मूळ आरक्षण आहे तो कश्या पद्धतीने देता येईल याचा पुरेपूर विचार सरकारने करावा जेणेकरून ओबीसी समाज सरकारच्या भक्कमपणे पाठीशी उभाराहील याचा विचार करावा.

आरक्षण



  • ओबीसी समाज एक व्हा

ओबीसी समाजात अनेक जातींचा समावेश आहे आणि जिथं अनेक जाती एकाच ठिकाणी समाविष्ट असतात,तिथली परीस्थिति आपण बघितली आहे परंतु आपल्या वर अन्याय होत असेल तर मतभेद बाजूला सारून अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला एक व्हा,जेणे करून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करता येईल. कोणत्याही राजकीय नेत्याच्या किंवा गावातील हांप लिडरच्या भूलथापांना बळी न पडता,ओबीसी समाजात एकजूठीची भावना निर्माण करून आपल्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या आणि आपली वज्रमुठ मजबूत करा,जेणेकरून सरकारची ओबीसी समाजावर अन्याय करण्याची हिम्मत होणार नाही.

एकोपा निर्माण करा,एकजूठीने संघर्ष करा आणि आपल्यावर अन्याय होत असेल तर हिमतीने पुढे या एवढीच विनंती,ओबीसी बांधवांना करतो....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या