Ad Code

Responsive Advertisement

किमान आधारभूत खरेदी केंद्राची ऑनलाइन नोंदणी सुरू करावी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी



किमान आधारभूत खरेदी केंद्राची ऑनलाइन नोंदणी सुरू करावी 
 चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

चामोर्शी तालुक्यात भात शेतीची लागवड भरपूर प्रमाणात घेतल्या जाते.त्यामुळे शेतकरी किमान आधारभूत केंद्रा कडे नावं नोंदणी करण्यासाठी वाट पाहत असून लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू करावी,अशी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे आणि एखदा नावं नोंदणी झाली की शेतकरी शेतात पिकविलेला धान किमान आधारभूत केंद्रावर विक्री करण्यासाठी मोकळा असतो.
आधारभूत खरेदी केंद्र



  • नावं नोंदणी गरजेची आहे

किमान आधारभूत खरेदी केंद्र चामोर्शी येथे तालुक्यातील भातपीक पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम आपल्या शेतीची एकून आराजी सहित ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे गरजेची असल्यामुळे चामोर्शी तालुक्यातील भातपीक शेतकरी ऑनलाइन नोंदणी केव्हां सुरू होतेय याची उत्सुकतेने वाट बघत आहे,कारण किमान आधार खरेदी केंद्रात नावं नोंदणी केल्या शिवाय समोर शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील धान्य विकण्याची मुबा नसल्यामुळे नावं नोंदणी प्रक्रिय कधी सुरू होतेय असं तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना वाटायला लागले आहे आणि जर का एखदा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली की,शेतकरी धान पिकाच्या कापण बांधणीला सुरुवात करण्यास मोकळा होतो.

आधारभूत खरेदी केंद्र


  • प्रत्येक शेतकऱ्यांनी नावं नोंदणी करावी

चामोर्शी तालुक्यातील शेतकरी आता भरपूर प्रमाणात हायब्रिड धानाची लागवड करीत असल्यामुळे,हायब्रिड धान विक्री करण्यास किमान आधारभूत खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे कारण महाराष्ट्र सरकारने ठरविल्या किमतीवरच खरेदी केंद्रावर धान्य खरेदी केल्या जाते आणि हायब्रिड धानाला खाजगी व्यापारी महाराष्ट्र सरकारने ठरविलेला किमंत देवू शकत नाही,त्यामुळे किमान आधारभूत खरेदी केंद्र शेतकऱ्याच्या हिताचे असल्यामुळे धान्य विक्रीस काहीच अडचण नाही. बाकीच्या काही किरकोळ बाबी वगळता धान्य खरेदी केंद्र शेतकऱ्याच्या हिताचे आहे,त्यामुळे चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मी विनंती करतो की,कुठल्याही खाजगी व्यापाऱ्याला कमी भावात आपले धान विकू नये,विकतांना उशीर झाला तरी चालेल परंतु शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रावरच विकावे आणि खाजगी व्यापारी यांच्या कडून होणारी लूट थांबवावी.


महाराष्ट्र सरकारने मागील वर्षी किमान आधारभूत खरेदी केंद्रावर आपले नावं नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता जाहीर केला आणि ज्या शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर नावं नोंदणी केले,अश्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू झाला सर्वांना सारखाच मिळाला,म्हणून यावर्षी चामोर्शी तालुक्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांनी किमान आधारभूत खरेदी केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने आपआपली नावे नोंदणी करावी,लाभ मिळाला तर ठीक,किंवा नाहीतरी ठीक.

  • आदिवासी फेडरेशनची नोंदणी सुरू झाली

महाराष्ट्र सरकारने आदिवासी फेडरेशनची ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया सुरू केली परंतु सरकारने गैरआदिवासी खरेदी केंद्राची ऑनलाइन नाव नोंदणी अजूनही सुरू केलेली नाही आणि ती लवकर सुरू करावी किंवा किमान आधारभूत खरेदी केंद्राची नाव नोंदणी लवकरात लवकर सुरू करावी अशी चामोर्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची शासनाला विनंती.

आधारभूत खरेदी केंद्र



  • महाराष्ट्र सरकारने बोनस जाहीर करावा

किमान आधारभूत खरेदी केंद्रावर जो शेतकरी नावं नोंदणीकरून धानाची विक्री करतो त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने बोनस जाहीर करावा,कारण महागाईच्या काळात शेती सुद्धा न परवडणारा व्यवसाय असून शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक विवचणेत भरडला जात असून. शासनाने शेतकऱ्यांचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना बोनस जाहीर करावा,म्हणजे हवालदिल झालेला शेतकरी आपल्या संसाराची विसकुटलेली घडी बसविण्यात समर्थ ठरू शकतो.

वाढत्या महागाईच्या विचार केला तर शेतकऱ्यांची मोठी गंभीर समस्या आहे आणि शेती हा व्यवसाय आता फायद्याची राहिली नसून दिवसेंदिवस ती नुकसानीतच जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच हित लक्षात घेऊन किमान आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकणाऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर करावा आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढावा,हिच महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या