Ad Code

Responsive Advertisement

माधुरी दिक्षित लोकसभा निवडणूक लढणारं......



माधुरी दिक्षित लोकसभा निवडणूक लढणारं....

निवडणुका जवळ आल्या की,राजकीय पुढारी यांना निवडणुकीचे डोहाळे लागतात परंतु चित्रपटातील अभिनेत्याला डोहाळे लागतात. आता तर धग-धग गर्ल माधुरी दिक्षित राजकारणात नवी एंट्री घेत तिच्या चाहत्यांना दिवाळी गिफ्ट दिली,असं म्हणायला हरकत नाही.


माधुरी दिक्षित


  • चित्रपट अभिनेते राजकारणात

संजय दत्त,हेमा मालिनी,राजबबर,जया बच्चन,धर्मेंद्र,सनी देओल,उर्मिला मातोंडकर,गोविंदा अशा अनेक चित्रपट कलाकारांनी राजकारणात सक्रिय सहभागी होत आपली प्रतिमा चित्रपटांसोबत राजकारणात देखील स्वताची ओळख निर्माण केली. काही यशस्वी झाले,तर काही अपयशी झाले,तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण चित्रपटात सक्रिय होऊन स्वताची ओळख निर्माण करणारी धग-धग गर्ल म्हणून जिचा नावलौकिक आहे,अशी चित्रपट नायिका माधुरी दिक्षित. चित्रपटात अगदी वेगळी ओळख निर्माण करून लाखों चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री माधुरी दिक्षित आता मुंबई मधून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली आहे आणि माधुरी दिक्षित मुंबई लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढण्याचे संकेत आहेत आणि भारतीय जनता पक्षाने माधुरी दीक्षितच्या नावाला अनुमति दर्शवली आहे.

माधुरी दिक्षित



लोकप्रियतेमुळे अनेकदा चित्रपटातील कलाकार निवडणूक जिंकून संसदेत पोहचतात काही चित्रपट कलाकार जनतेने दिलेल्या संधीचा फायदा करून घेतात. बॉलीवुडनंतर आयुष्याच्या दुसऱ्या इंनिंगमध्ये राजकारणात जम बसविणारे अनेक चित्रपट कलाकार आहेत तर काही चित्रपट कलाकार अपयशी सुद्धा झालेले आहेत. उदाहरणा दाखल सांगतो म्हटलं तर दिवंगत अभिनेते सुनील दत्त जीवनाच्या अखेर पर्यंत राजकारणात टिकून राहिले,त्यांनी त्यांचा एक वेगळं वलय निर्माण केलं. राजबब्बर,हेमा मालिनी असे अनेक कलाकार आहेत आणि चित्रपटातून राजकारणात एंट्री घेणारे अभिनेता गोविंदा हे मात्र आपल्या नावाचं वलय निर्माण करण्यात अपयशी ठरलेत. त्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर उत्तर मुंबईमधून निवडणूक लढवली,तेही भारतीय जनता पक्षाचे बडे नेते मा. राम नाईक यांना पराभूत करीत थेट संसदेत पोहचले परंतु गोविंदा नंतर मात्र फारसे जनतेमध्ये दिसले नाही परिणाम असा झाला की,कॉंग्रेस पक्षानी दुसऱ्यांदा गोविंदाला टिकीतच नाकारलं. राजकीय पक्षांनी जरी निवडणुकीची संधि दिली असली तरीपण जनतेमध्ये मिसळून आपल्या मतदार संघातील कार्यकर्ते जपणे हे जितके महत्वाचे आहे,तितकेच जनतेचे प्रश्नमार्गी लावणे हे देखील महत्वाचे असते.

एखाद्या मतदार संघात राजकीय पक्षाची तितकी ताकद नसते,त्यावेळी चित्रपट कलाकाराची प्रतिमा किंवा ओळख यांचा वापर करून घेण्याचा राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो आणि पक्षाची ताकद नसली तरी परंतु अभिनेत्याच्या ओळखीमुळे मतदार संघावर ताबा मिळविता येते,असा कयास असतो आणि उत्तर मुंबईतून गोविंदाच्या लोकप्रियतेमुळे कॉंग्रेस पक्षाला यश मिळाला मात्र तो फार काळ टिकवता आला नाही.
माधुरी दिक्षित



महाराष्ट्र वगळता देशातल्या अनेक राज्यामध्ये बॉलीवुड कलाकार राजकारणात आपली ताकद पणीला लावत आपला दबदबा निर्माण केला आहे. पश्चिम बंगाल मध्ये बहुतेक चित्रपट कलाकार राजकारणात यशस्वी झालेले आहेत,दक्षिणेत सुद्धा काही चित्रपट कलाकारांनी राजकारणात आपली ओळख निर्माण केली आहे.
  • माधुरी दिक्षित राजकारणात सुद्धा यशस्वी होणार

 हिन्दी चित्रपटात माधुरी दिक्षित आपल्या नावाचा दबदबा निर्माण करून चाहत्याच्या मनावर अधिराज्य निर्माण करण्यात यशस्वी झाली. आता सध्या चित्रपटापासून दूर गेली असली तरी पण माधुरी दिक्षित नावं समोर आलं की धग-धग गर्ल नजरेसमोर झळकते, 


आणि असे यशस्वी कलाकार राजकारणात उतरण्याची तयारी दर्शवीत असतील तर त्यांच्या चाहत्यांसाठी एकावं ते नवलच असं म्हणाव लागेल परंतु यात काही गैर नाही. माधुरी दिक्षित राजकारणात येवून लोकसभा निवडणूक लढवावी तिचं स्वागतच आहे. माधुरी दिक्षित मुंबईच्या कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली तरी पण विजय निश्चित आहे आणि माधुरी दिक्षित राजकारणात सुद्धा यशस्वी होईल यात दुमत नाही.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या