Ad Code

Responsive Advertisement

राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे चिचडोह बॅरेज बनलाय शोभेची वस्तु



राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे चिचडोह बॅरेज बनलाय शोभेची वस्तु

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणजे चामोर्शी आणि जिल्ह्यातील सर्वात मोठया वैनगंगा नदीवर दिमाखाने चीचडोह बॅरेजची उत्पत्ति झाली.तालुक्यातील चामोर्शी तालुक्यातील जनतेच्या आशा आकांक्षा पल्लवित झाल्या आणि सहाजिक आहे परंतु राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे एवढा मोठा प्रकल्प बिनकामाचा हत्ती ठरला आणि जनतेची हीरभोंड झाली.

चिचडोह बॅरेज



  • खासदार आमदार यांचा निष्काळजीपणा

गडचिरोली जिल्ह्यात एक खासदार आणि एक आमदार वास्तव्यास असून नुसत्या या लोकांच्या निष्काळजीपणामुळे चामोर्शी तालुक्याला वरदान ठरणारा चिचडोह बॅरेज जर बिनकामाचा ठरत असेल तर असे निष्काळजी राज्यकर्ते काय कामाचे असा,तालुक्यातील जनतेतून सुर उमटत आहे आणि हे वास्तव आहे.

चामोर्शी तालुका आधीच रोजगारहीन तालुका असून,बहुतांश लोक शेतीला आपल्या उपजीविकेचा साधन म्हणून शेती करीत असतांना असे बॅरेज शेतीला वरदान ठरू शकतात. खासदार आमदार साहेबांना कदाचित शेतीला पाण्याची गरज आहे हे माहीत नसावं किंवा ते जनता मेली तरी चालेल अशी विचारसरणी असावी आणि इतके बेजबाबदार आणि उदासीन लोकप्रतिनिधी जर या तालुक्याला लाभत असतील तर जनता मेल्या शिवाय राहणार नाही,एवढं मात्र खरं.

चीचडोह बॅरेज
  • तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता

गडचिरोली जिल्ह्यात एवढा मोठा एकमेव बॅरेज असून त्याचा योजय नियोजन करून पाण्याची शेतीकरिता योग्य विलेवाट लावले असते,तर चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी बारमाही पाण्याची सोय झाली असती आणि बारमाही पाण्याची सोय झाली असती तर चामोर्शी तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला असता,यात तिळ मात्र शंका नाही. आज तालुक्यात रोजगार नाही,म्हणून तालुक्यातील लोक मिरची तोडण्यासाठी बाहेरच्या राज्यात जाऊन काम करतात,तेंदू पत्याचे बोध भरण्यासाठी सुद्धा बाहेरच्या राज्यात जाऊन काम करतात,कदाचित ती वेळ चामोर्शी तालुक्यातील जनतेवर आली नसती,म्हणजे तालुक्यातील जनतेवर किती विचित्र प्रसंग आला आहे,हे लक्षात घ्या,म्हणजे कथा कुणाची आणि व्यथा कुणाला अशी तालुक्यातील जनतेची परीस्थिति झाली आहे. मला व्यक्तीक टिका करायची नाही आहे,परंतु राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे चीचडोह बॅरेज धुळखात पडला आहे,हे मात्र खरं आहे.

  • अजूनही वेळ गेलेली नाही

या जिल्ह्यातील राज्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की,आजपर्यंत जे झाल ते विसरून जा,परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. तेव्हा खासदार साहेब तुम्ही दोन वेळ याच लोकसभा क्षेत्रातून निवडून आलात आणि तेही भरघोष मत्ता धिक्याने तेव्हां चामोर्शी तालुक्यात उभा असलेला चिचडोह बॅरेजचा प्रश्न मार्गी लावा,कारण तुम्ही काही विरोधी पक्षात नाही आहात,सत्ता तुम्हचीच आहे आणि तुम्ही मनात धरले तर आताही वेळ गेलेली नाही,एखदा होवूनच जाऊ दया. लावा आपली ताकद पणाला नाही तर चामोर्शी तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघतच आहे.आणि पुढचा मार्ग खडतर आहे हे खासदार साहेब तुम्हाला माहीतच आहे. दोन वेळा घरात बसून होते,तरी चामोर्शी तालुक्यातील जनता भरघोष मतांनी निवडून तुम्हाला संसदेत धाडली पण आता साहेब तसं होणार नाही,जनता हुशार झाली आहे आणि तुम्ही ते समजून जा,समोर धोक्याची घंटा आहे.

चिचडोह बॅरेज


आणि आमदार होळी साहेब तुम्ही सुद्धा चामोर्शी तालुक्याचा सारासार विचार करा,कारण तुम्हचा गृह मैदान आहे. तालुक्यातील जनता तुम्हाला सुद्धा दोन वेळा आमदारकी बहाल केली,ज्या लोकांनी तुम्हाला विधीमंडळात नेतृत्व करण्याची संधि दिली,त्याच जनतेला तुम्ही विसरलात हे यावरून स्पष्ट होते. आमदार साहेब भेंडाळा येथे रस्ता बांधकामासाठी रस्ता रोको केलात आणि स्वताचाच हशा करून घेतलात परंतु तोच रस्ता रोको जर का चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचा पाणी शेतकऱ्यांच्या शेतपिकला मिळाला पाहिजे म्हणून रस्ता रोको केला असता तर तालुक्यातील जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचायला मागे पुढे पहिली नसती,एवढं मात्र खरं आहे.

पण अजूनही वेळ गेलेली नाही,कारण राज्यात सरकार तुम्हचाचं आहे तेव्हा वटे खोचा आणि लागा कामाला,यात तुम्हाला यश नक्की येईल म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हचही भलं होईल आणि तालुक्यातील जनता तुम्हाला जनतेचही भलं होईल.

आणखी वाचा : आमदार साहेब तुम्हचा मोर्चा,तुम्हचे सरकार अन तुम्हचाच पर्चा....
  • चिचडोह बॅरेजच पाणी शेतीला दयावा,हे देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

आमदार साहेब तुम्ही काहीच चिंता करू नका कारण भेंडाळा परिसरातील भारतीय शेतकरी एकता पॅनल चे शेतकरी शिष्टमंडळ तुम्हच्या आधीच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देवून चीचडोह बॅरेजचा पाणी शेतीला मिळावं म्हणून चर्चा केलेली आहे,

चिचडोह बॅरेज


आता तुम्हच काम फक्त निधी आणण्याचं आहे आणि तुम्ही पक्षाचे कर्तव्य दक्ष आमदार आहात,मनात आणलं तर सर्व करू शकतात,फक्त ते तुम्हच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या