Ad Code

Responsive Advertisement

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात शासन असमर्थ

 

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यात,

 शासन असमर्थ 

भारत देशात ७० % ते ८० % लोक शेतीला व्यवसाय समजून शेती करीत आहे परंतु दिवसेंदिवस शेती सुद्धा न परवडणारा व्यवसाय होण्याच्या मार्गावर असून शेतकाऱ्यांसमोर आता नवीन संकटाला तोंड दिल्याशिवाय पर्याय नाही अशी बिकट अवस्था आज शेतकऱ्यांची झाली असून,शेतकऱ्यांचा वाली कुणीच नाही,असं म्हणावं लागेल.

महागाईच्या कवाटात शेतकरी अर्धाअधिक मेलेलाच आहे,कारण रासायनिक खताच्या किमंतीत भरमसाठ वाढ झालेली असून औषधांची किमंत सुद्धा अव्वाच्या-सव्वा होवून गेली असल्यामुळे शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले असून अशा परस्थितीत शेतकरी स्वताला सावरुच शकत नाही,अशी गत शेतकऱ्यांची झालेली आहे. 

शेतकरी

  • शेतमालाला दर मिळत नाही 

वडीलो पार्जित व्यवसाय असल्यामुळे आणि शेतकाऱ्यांकडे दुसरं कोणतचं व्यवसाय नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेती शिवाय दूसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव शेतीचा व्यवसाय करीत असून तो सुद्धा आता न परवडणारा व्यवसाय होणाच्या मार्गावर असल्यामुळे आता नवं संकट शेतकाऱ्यांसमोर उभा आहे. 

शेतमालाला पाहिजे त्या प्रमाणात दर मिळत नसल्यामुळे सर्वात मोठी अडचण शेतकऱ्यांची झालेली आहे आणि याच कारणामुळे शेती व्यवसाय डबगाईस येणाच्या मार्गावर आहे. शेतकरी शेतात राब-राब करून शेतीचा पीक घेतो परंतु आपल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही,जो शेतकरी शेतात राब-राब राबून पिकविलेल्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही,म्हणजे किती मोठं शेतकऱ्यांच दुर्दैव आहे हे सर्वात आधी समजून घ्या आणि जर का शेतमालाला भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला असता तर शेती व्यवसाय कधीच डबगाईला आला नसता. 

शेतकरी

  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू,अशी सरकारची वल्गना 

भारत सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आश्वासन देवून मोकळे झाले,म्हणजे शेतकऱ्यांना मूर्ख बनविण्याचा अधिकार आहे. कारण काय तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार,म्हणजे नेमक काय करणार ? सरकार कोणत्या भरोशावर उत्पन्न दुप्पट करणार,आज सांध गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर उदयोग हीन जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्हयाच नाव लौकिक मिळविण्यास यश संपादन केलेला आहे. 

आणखी वाचा :राज्यात मृत्यूचे तांडव माय-बाप सरकार जागे व्हा जनतेची आर्त हाक....

शेतकऱ्यांना २४ तास लाईट मिळावं म्हणून लाख प्रयत्न चालू असतांना सरकार २४ तास लाईट देवू शकत नसल्यामुळे शेतकाऱ्याचे उभे पीक नष्ट झाले आहेत. नहराचा पाणी शेतीला मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि तिकडे सरकार म्हणतोय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणजे शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे,दुसरं काही नाही. 

मायबाप सरकार एकाच पिक्काची काळजी घेऊन २४ तास वीज पुरवठा केले तरी पण भरपूर आहे. ज्या शेतकऱ्यांना नहराचा पाणी मिळत नाही त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं तरी भरपूर आहे आणि शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तरी भरपूर आहे आणि या सर्व सोयी शेतकऱ्यांना मिळवून दिल्या तरी शेतकऱ्यांनी स्वताच्या अंगमेहनतीने शेतातून सोनं पिकविण्यास समर्थ आहे,पण 



या सर्व गोष्टी सरकार शेतकऱ्यांना देवू शकत नाही,हे काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून आजच्या घडीला शेतकाऱ्यांचा वाली कुणीच नाही,म्हणून शेती करणं सुद्धा शेतकऱ्यांना परवडणारी नाही परंतु दुसरं काहीच व्यवसाय नसल्यामुळे शेतकरी राबराब राबतो,अनेक अडचणींना तोंड देत पुढं जाण्याचा प्रयत्न करतो परंतु पुढची वाट बिकट आहे,मार्ग खडतर आहे तरी पण न दगमगता शेतीकरून देशाला अन्नधान्य पुरवितो,याचा विचार करा.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या