Ad Code

Responsive Advertisement

जगाचा पोशिंदा बळीराजा



जगाचा पोशिंदा बळीराजा

भारत हा कृषिप्रधान देश आहे ८० % लोक या देशात शेतीचा व्यवसाय करीत आहे. देशात हरितक्रांती घडवून आणल्या गेली ती यासाठी की,भारतीय शेती सुजलाम सुफलाम झाली पाहिजे. यासाठी केंद्र स्तरावर व राज्य स्तरावर मोठा गाजावाजा करून घडवून आणल्या गेली,की भारतीय शेतकरी सुखी झाला पाहिजे. त्यांच्या संसाराची घडी योग्य रीतीने बसली पाहिजे,यासाठी खूप मोठा प्रयत्न केल्या गेले,धरणं बांधन्यात आले शेती उपयोगी अवजारे वाटण्यात आली आणि देशाच्या इतिहासात भारतीय शेतकरी सुखी,समृद्ध झाला असा गैरसमज पसरवून शेतकऱ्याची दिशाभूल करण्यात आली.

बळीराजा



परंतु भारतीय शेतकरी खरोखर सुखी झाला का ? नाही,भारतीय शेतकऱ्याची परीस्थिति मोठी बिकट आहे. शेतकऱ्याची परीस्थिति किती राज्य कर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी जवळून पहिली आहे काय ? तर त्याचा उत्तर देशातील ८० % लोक नाहीच म्हणणार कारण परीस्थिति तशीच आहे. शेतकऱ्यांसाठी आलेली योजना देशातील राज्यकर्ते अर्धीअधिक गिळून टाकतात,त्याच्यातला काही भाग अधिकारी वर्ग खाऊन पचवून टाकतात,शेतकऱ्यांपर्यंत फक्त अक्षरालावण्यापुरती वस्तु वाटल्या जातात आणि तो मुकूटपणे त्या वस्तूचा स्वीकार करतो त्यालाही त्याच्यात समाधान आहे की पाचसे रुपयाची वस्तु आपल्याला दोनसे रुपयात मिळाली म्हणून (जळत्या घराचा वासच ठीक आहे ) अगदी त्याचप्रमाणे.

बळीराजा



शेतकाऱ्याच्या मालाला बाजारपेठेत चांगली मागणी होवून जरं का योग्य रीतीने मालाला भाव मिळाला असता तर शेतकरी सुजलाम सुफलाम झाली असं म्हणता आला असता परंतु दिवसेंदिवस तीही गोष्ट पाहिजे तेवढी सोपी वाटत नाही. साधी मालदारची एक पुडी विकत घ्यायला गेलं तर दुकानदार ठणकावून सांगतो,मालदारची किंमत आता दुप्पट झाली आहे,तेव्हा मात्र आपण मुंग गिळून उभे राहतो आणि भाव वाढला असेलेच असं भाव चेहऱ्यावर आणून आपण निमूटपणे विकत घेतो. दोन रुपयांची हळदीची पुडी तयार होते तेव्हा कंपनी तिचा भाव ठरवून ठेवतो,तसं मात्र जगाचा पोशिंदा म्हणून ज्याला पदवी दिल्या गेली त्या शेतकऱ्याच्या मालाची किंमत शेतकऱ्यालाच माहीत राहत नाही,केवढी बिकट अवस्था आहे असं म्हणावं लागेल. शेतकऱ्यांची बिकट अवस्था कुणालाच माहीत नाही,कदाचित जो शेतकऱ्यांमध्ये राब-राब राबतो त्यालाही माहीत नसेल,इतकी भयानक परीस्थिति वाईट आहे,त्याला कारण फक्त भारतीय अर्थव्यवस्था आहे,असंच म्हणावं लागेल,जो पर्यंत शेतकऱ्याच्या मालाला निश्चित असा हमी मिळणार नाही. शेतीच्या कार्यपद्धतीत बदल होणार नाही तोपर्यंत भारतीय शेतकरी सुखी होणार नाही. शेतकऱ्यांची दिवाळी कधीच साजरी होत नाही,तो नेहमी अंधारातच राहतो. दिवाळी साजरी होते ती म्हणजे पुढाऱ्यांची,दिवाळी साजरी होते ती म्हणजे अधिकाऱ्यांची आणि दिवाळी साजरी होते ती म्हणजे महाराज्यांची शेतकरी मात्र अंधारातच राहतो त्याच्या डोक्यावर फाटकीच टोपी,फाटकाच शेला राहतो आणि दिवसभर कष्ट करणारी माऊली ची साडी,चोळी तीही फाटकीच राहतो म्हणून मी म्हणतो बदलायची असेल तर आधी मानसिकता बदलली पाहिजे,कार्यप्रणाली बदलली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे तरच शेतकरी सुखी समृद्धी होईल अन्यथा ती जशी आहे तशीच राहील,यात कुणाचाही दुमत नाही.




ऊन,वारा,पाऊस यांची पर्वा न करता शेतकरी राब-राब राबतो परंतु शेतकऱ्यांच्या पोटी निराशाच येते. साधा उदाहरण घेतो म्हटलंतर जे शेतकरी पंपधारक आहेत,त्यांच्या कडे सर्वसुविधा असून सुद्धा २४ तास वीज मिळत नाही म्हणून उभं पीक मातीमोल होऊन जातं.शेवटच्या गावांपर्यंत नहराचा पाणी मिळत नाही तेव्हाही शेतातील उभं पीक नष्ट होऊन जातो. इतकी भयानक खराब परीस्थिति आज शेतकऱ्यांची झालेली आहे मग लाहणग्या रोपट्याचं वृक्षात रूपांतर करताना किती यातना भोगाव्या लागत असतील आणि या यातना शेतकरी स्वता सहन करून जगाला अन्न दाता समजतो,म्हणजे विचार करा किती सहनशक्ति शेतकऱ्यांच्या अंत करणात भरलेली असेल. स्वताच्या मुलीचं लग्न होतो तेव्हा त्याच्या डोक्यावरचा शेला हा नवीन नाही तर तो फाटकच असतो.

बळीराजा



शेतकरी आणि जळणारा दिवा यांची परीस्थिति सारखीच आहे. जळणारा दिवा दुसऱ्यांना प्रकाश देतो परंतु अंधार त्याच्या स्वता जवळ असते अगदी तशीच शेतकऱ्यांची अवस्था होवून गेलेली आहे म्हणून मायबाप सरकार शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्या आणि बि-बियाने,रासायनिक खते,रासायनिक औषधे ही अर्ध्या किमतीवर उपलब्ध करून द्यावे आणि शेतकऱ्यांना मदत करावी म्हणजे जगाचा पोशिंदा बळीराजा सन्मानाने जीवन जगू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या