Ad Code

Responsive Advertisement

शेतकऱ्यांच्या पोरा तू लढायला शिक



शेतकऱ्यांच्या पोरा तू लढायला शिक 

जगाचा पोशिंदा बळीराजा,भूमिपुत्र अशी अनेक प्रकारचे आमुषन माझ्या शेतकरी राज्याला दिलं गेलं आहे.जितकी आमुषन दिल्या गेली तितकीच देशातल्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची अवेहलना पण केली पण बिचारा बळीराजा मुंगगिळून सहन करीत राहिला आणि आजही करीत आहे पण हे कुठतरी थांबायला पाहिजे याच्यात बदल व्हायला पाहिजे तेव्हा कुठं शेतकरी सुखी आणि समृद्ध होईल पण आता शेतकऱ्यांच्या पोरा तुला लढायला पाहिजे होत असलेल्या अन्याया विरोधात आवाज उठवायला पाहिजे नाहीतर जसे आपल्या बापाचे हाल होत आहेत समोर आपलेही झाल्या शिवाय राहणार नाही हे मात्र सत्य आहे.
बळीराजा


  • हात धरून चला,कुणाचे पाय धरायची गरज नाही 
या देशातल्या राज्यकर्त्यांनी माझ्या बळीराज्याचे पार वाटोळे करून टाकले फाटकीच बांडी अन फाटकाच शेला हा सूत्र वापरून शेतकऱ्याचे कंबरडे मोडले कारण राब राबतो तो शेतकरी आणि पिकवलेल्या शेतमालाला भाव ठरविणारे वेगळेच आहेत.म्हणून शेतकरी कितीही शेतात राबला तरी परंतु त्याच्या नशिबी सुखाचे दिवस कधीच येणार नाहीत कारण आपलेच राज्यकर्ते शेतकऱ्याची फसवणूक करून त्याच्या टाळू वरची लोणी खाणारे मांजरीचे बोके होवून बसले आहेत.आता शेतकऱ्याचे दुःख नाही सहन होत त्याला कुठंतरी आळा बसायलाच पाहिजे गुलामाला गुलाम असल्याची जाणीव झाली की,तो बंड करून उठेल असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आणि हे सत्य आहे.

यावर एकच पर्याय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांनी समोर येवून पुढाकार घ्यायला पाहिजे,संघटित व्हायला पाहिजे.शेतकऱ्यांवर होणाऱ्या अण्याया विरोधात पेटून उठायला पाहिजे.क्रांतीचे शस्त्र हातात घेऊन सरकार विरोधात बंड करायला पाहिजे आणि हे सर्व करीत असताना आपला आवाज कोणी दाबण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे तेव्हा कुठं शेतकऱ्यांच्या व्यथा,यातना,हालअपेष्ठा शासना दरबारापर्यंत पोहचायला मदत मिळेल नाही शेतकऱ्यांच्या पोरा तू कागदावर लिहून ठेव जशी आपल्या बापाची गत झाली अगदी तशीच गत आपली झाल्या शिवाय राहणार नाही,हे मात्र काळ्या दगदा वरची रेष आहे.

बळीराजा



शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या विचाराचा तंतोतंत पालन करा यश तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही इतके संघटित व्हा,इतके संघटित व्हा आणि एकमेकांचे आचार विचार समजून एकमेकांचे हात धरून चला म्हणजे समोर कुणाचे पाय धरण्याची वेळ येणार नाही तिथं राज्यकर्ते आपल्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्यांच्या कडे शिलक्क राहणार नाही.पण सर्वात आधी शेतकऱ्यांच्या पोरा तू लढायला शिख जो पर्यंत हातात क्रांतीचे शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरणार नाही सरकार विरोधात आवाज उठविणार नाही तोपर्यंत क्रांतीच घडविता येणार नाही आणि जो पर्यंत क्रांती घडणार नाही तो पर्यंत शेतकऱ्यांच्या पोराला महत्व प्राप्त होणार नाही आणि जो पर्यंत आपण कोण आहोत याची जाणीव होणार नाही तो पर्यंत गलितला कुत्रा सुद्धा आपल्याला ओळखणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरा तुला आधी लढायला शिकावे लागेल.

बळीराजा

  • शेतकऱ्यांचे पोरं आणि आंदोलन 
हे राजकारणी बोके शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाण्यात मग्न आहेत.आणि टाळूवरचं लोणी संपली की आपल्या बापाला सुद्धा खायला मागे पुढं पाहणार नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या पोरा तू लढायला शिख.आपण कित्येक वेळा शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असतात पण त्याला मागं खेचायचे काम हे शेतकऱ्याचे पोरंच करतात कारण आंदोलनात सहभागी होण्याची हिंमत त्याच्यात नाही म्हणून आंदोलनाच्या वेळी गरीब शेतकरी आपल्या न्याय हक्काची लढाई लढायला रस्त्यावर उतरतो पण आपला पोरगा समोर येताना दिसत नाही याचं सर्वात जास्त दुःख वाटते अरे हक्काची मागणी मागायची असेल तर रस्त्यावर बाप नाही तर पोरगा यायला पाहिजे तेव्हा कुठं क्रांती घडवून आणता येईल नाहीतर  आपण एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न राहीलो तर हे राजकारणी बोके आपल्याला गिळ्या शिवाय राहणार नाहीत,हे ही तितकेच सत्य आहे.


  • कॉन्ट्रॅक्ट बेस नौकरी अन शेतकऱ्यांचे पोरं 
उभ्या भारत देशात जरी विचार करायला गेलं तर तिथं कॉन्ट्रॅक्ट बेस नोकरीवर जे युवक रुजू आहेत ते फक्त  शेतकऱ्याचे पोरं आहेत आणि जिथं शेतकऱ्याचे पोरं आहेत तिथच नेमका घोळ आहे हे आधी समजून घ्या
बळीराजा



म्हणून माझ्या शेतकरी पुत्रांसमोर एकच विनंती करतो की शेतकरी पुत्रांनो उठा अन् जागे व्हा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर होत असलेल्या अन्याय,अत्याचार याचा पाढा वाचायला सुरूवात करा हातात शस्त्र घेऊन नव्हे तर हे दणकट माझे बाहू या विचाराने जागृत व्हा आणि होणाऱ्या अन्याय्य विरुद्ध पेटून उठा रस्त्यावरची लढाई लढायला शिखा आणि महत्वाचं म्हणजे संघटित व्हा जो पर्यंत शेतकऱ्यांच्या पोरगा संघटित होणार नाही तो पर्यंत अन्याय विरुद्ध आवाज उठविता येणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात जागे व्हा वीरांनो वैऱ्याची रात्र आहे. जिकडे बघावे तिकडे अन्याय होत आहे आणि हे सत्य आहे. 

शेतकऱ्याच्या पोरा तु जागा हो,डोळे उघड आणि अन्यायाचा प्रतिकार करायला सज्ज हो नाहीतर आपला बाप संपला अगदी तसचं आपणही संपल्याशीवाय राहणार नाही,तेव्हा तू जागा हो आणि विकासाचा धागा हो.
मराठी पाऊल पढती पुढे याच आशेनि पुढचं पाऊल टाक,यश तुझ्या पायाशी लोटांगण घातल्या शिवाय राहणार नाही,हे मात्र सत्य आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या