Ad Code

Responsive Advertisement

अवकाळी पाऊसामुळे,चामोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल

 


अवकाळी पाऊसामुळे,चामोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल 

महाराष्ट्रातील अतीदुर्गम जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्हा सर्वांना परिचित आहे आणि त्यात जिल्ह्यातील तालुका म्हणजे चामोर्शी तालुक्याचा समावेश होत असून तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊसाने पूर्णता कंबरडे मोडले असून,शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी हिच अपेक्षा तालुक्यातील शेतकरी करीत आहे आणि आशा आहे की महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांना मदत केल्या शिवाय राहणार नाही,हिच अपेक्षा बाळगुण आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी शासन दरबारी आपली व्यथा मांडत आहे.


शेतकरी
  • चामोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल

गडचिरोली अति मागासलेला आणि उदयोग हीन जिल्हा म्हणून संपूर्ण देशात हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झालेला असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत,अशी परिस्थिति तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली असून तालुक्यातील शेतकऱ्यांना आस लागलेली आहे,हे यावरून स्पष्टपणे साबीत होत आहे.
पऱ्हे टाकण्यापासून रोपाची वाढ होईपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतल्या गेली व रोपट्यांपासून ते लोंब येईपर्यंत शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे अतिदक्षता काळजी घेऊन त्यांचा सांभाळ केलेला असून एन हाती आलेला पीक जर नष्ट होत असेल तर माझ्या बळिराजाचे तर कंबरडे मोडणारच यात शंका नाही आणि राज्यातील हवालदार झालेला शेतकरी व त्यातल्या त्यात आणखी हवालदिल झालेला शेतकरी म्हणजे माझ्या चामोर्शी तालुक्यातील शेतकरी जर जास्त हवालदिल होत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं ?

शेतकरी
  • सरकारने भरीव मदत द्यावी

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील शेतकरी एन भात कापणीच्या वेळेवर जर आपल्या पदरी पडणाऱ्या शेत पिकांपासून जर वंचित होत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं ? अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिति असून,माय-बाप सरकारने नुकसान ग्रस्त भागांचे पंचनामे करून तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करावी हिच अपेक्षा तालुक्यातील शेतकरी बाळगुण असल्याचे आज तरी चित्र दिसत आहेत. राज्यातील चाळीस तालुके महाराष्ट्र सरकारने दुष्काळ ग्रस्त घोषित केलेले असून मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संहेबांना चामोर्शी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करावे अशी तहसीलदार साहेब चामोर्शी यांच्या मार्फत आधीच निवेदन सादर केलेले असून त्यात चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांवर होणारी शासन दरबारी मांडलेली असून त्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ?

 यावर समस्त तालुक्यातील शेतकऱ्यांची नजर लागलेली आहे. चामोर्शी तालुक्यातील भात पीक पिकविणाऱ्या शेतकऱ्यांवर ओढावलेला संकट याहीपेक्षा दुसरी अबबिती आजतरी तालुक्यातील शेतकऱ्यांन समोर नाही,हेच आजच्या परिस्थिति वरुण लक्षात येत आहे. तरी राज्यातील माय-बाप सरकारने चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी हिच अपेक्षा तालुक्यातील शेतकरी बांधव करीत आहे.

शेतकरी

  • हातचा पीक गेलातर शेतकरी मेल्या शिवाय राहणार नाही

गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम आणि रोजगार हीन तालुका म्हणून चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची गणना होते आणि अश्या रोजगार हीन तालुक्यातील शेतकरी आपली उपजीविका म्हणून तालुक्यातील शेतकरी शेतीला प्रथम प्राधान्य दिलेला आहे. अशा परिस्थितीत तोंडाशी आलेला घास जर शेतकऱ्यांच्या हातातून जात असेल तर चामोर्शी तालुक्यातील भात उत्पादन घेणारे शेतकरी मेल्या शिवाय राहणार नाही,ही सत्य परिस्थिति आहे.


चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीशिवाय दूसरा पर्याय उपलब्ध नाही म्हणून तालुक्यातील शेतकरी भात पिकाची लागवड करतो आणि तोही पिकं जर शेतकऱ्यांच्या हातातून जात असेल तर चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवीनच आर्थिक संकट आलेला आहे.
चामोर्शी तालुक्यातील शेतकरी पूर्णता हवालदिल झालेला असून घेतलेले पीक कर्जाचे हप्ते कोणत्या पद्धतीने परत करायचे हा नवीनच संकट आज शेतकऱ्यांसमोर ओढवलेला असून आता शेतकऱ्यांवर तारेपारची कसरत करावी लागत आहे,तरी माय-बाप सरकार यावर विशेष लक्ष केंद्रित करून चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अन्यथा चामोर्शी तालुक्यातील शेतकरी मेल्या शिवाय राहणार नाही,एवढं मात्र निक्कीच आहे.
   






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या