Ad Code

Responsive Advertisement

पहाटेचा शपथविधी सोहळा अन खरा सूत्रधार



पहाटेचा शपथविधी सोहळा अन खरा सूत्रधार

भारतीय जनता पक्षा सोबत युती करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा,शरद पवार यांनी अजित पवारांना पुढे करून पहाटेच्या सुमारास शपथविधी उरकून टाकला अन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून मोठ्या थाटामाठात संपन्न झाला,अन महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्ययांनाच अचंबित केल्या गेला परंतु यंतिउल खरासूत्रधार कोण ?,असा प्रश्न सर्व राजकारन्यांना पडला.
महाराष्ट्र राजकारण


  • पहाटेची शपथविधी अन सूत्रधार

भारतीय जनता पक्षा सोबत युती करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष राज्याच्या राजकारणात खळबळ उडूवून दिली. अन जगाच्या इतिहासात नोंद व्हावी अशाप्रकारे पहाटेला शपथविधी उरकून घेतला अन सर्व पक्षातील म्हणजे देशातील सर्वच राजकारणी अचंबित झाले,एकावे ते नवलच अशी परिस्थिति राज्याची होवून गेली होती.

भारतीय जनता पक्षाचे नेते मा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला,उभ्या महाराष्ट्रातिल राजकारणात नाही तर पूर्ण देशाच्या राजकारणात चर्चेला उधान आले होते,अन मोठी खळबळ उडाली होती आणि उलट-सुलट चर्चे नंतर सगळीकडे सावरासावर केल्या गेली अन पक्षाची बदनामी होवू नये किंवा आपली व्यक्तिगत बदनामी होवू नये म्हणून सर्व प्रकरण अजित पवारांच्या माथी मरून साहेब मोकळे झाले अन तो मी नव्हेच असा आव अंगलट येणारा प्रकरण सवरल्या गेला.

पण पहाटेची शपथविधी पार पडला अन पडद्यामागून राजकारण करणारे हेडमास्तरजीच कोण होते ? म्हणजे स्वता शरद पवार साहेबच होते त्यावेळी सुद्धा संपूर्ण देशाला माहीत होते परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार साहेबांनी सगळं प्रकरणाचा उलगडा केल्या मुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला माहीतच झालं म्हणजे सूंटी वाचून खोकला गेला अशी गत राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेबांची होवून गेली.

महाराष्ट्र राजकारण

  • अजित पवार स्पष्ट बोलून मोकळे झाले

भारतीय जनता पक्षा सोबत जाण्या बाबतच्या निर्णयाची माहिती शरद पवारांनी दिली होती आणि शरद पवारांनी मला बोलवून सांगितले की,आता तू सरकारमध्ये जा,मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो,असा गौप्यस्पोट उपमुख्यमंत्री मा. अजित पवारांनी काल म्हणजे शुक्रवारी करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली.

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या (अजित पवार गट) दोन दिवसीय चिंतन शिबिराचा समारोप करतांना अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये पडलेली फुट आणि सत्ता स्थापने नंतरचा घटना क्रम प्रथमच सविस्तरपणे उलगडला. माझ्या मते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार सत्य बोलले. मनात असंतोष खदखदत होता तो व्यक्त झाला.

  • भाजपा जैसे थे....

देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना राज्यात घडली यात मात्र भारतीय जनता पक्षाने सावध पवित्रा घेत पक्षात सगळं आलंवेल असल्याचे चित्र साकारले,म्हणजे जैसे थे. सत्ता आली तरी खूप हुरळून जावू नये अन सत्ता गेली की,आगडोंब करू नये,असा सावध पवित्रा घेत वातावरण उत्तमरित्या न्याहाळलं अन वातावरण शांत केलं. तसं भारतीय जनता पक्ष शांततेचच प्रतीक आहे आणि सत्ता लोपासू नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. पक्षाने दिलेला आदेश निमुष्टपणे एकाचं आहे आणि कार्य करायचं असा पक्षाचा नियम आहे आणि त्याचं तंतोतंत पालन करायचं असा नियम आहे.

आणखी वाचा : शरद पवार-एक संधीसाधू व्यक्तिमत्व 

  • राष्ट्रवादी कुणाची ?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फुट पडली असून सरळ-सरळ दोन गट एकमेकाच्या समोरा-समोर उभी ठाकली आहेत अन शरद पवार साहेब कितीही वल्गना करून सांगतील तरी पण आजच्या घडीला त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी-उभी फुट पडली असून दोन्ही पक्ष एकमेकां समोर उभी ठाकले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांचा जरी विचार करायला गेलं तर पक्षाचे ४० आमदार अजित पवारांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत आणि हिच खरी वस्तुस्थिती आहे. 
महाराष्ट्र राजकारण


सरळ-सरळ पक्षावर अजित पवारांचा वरदहस्त आहे आणि आता राहील प्रश्न पक्षाचा आणि चिन्हाचा पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वाद जरी कोर्टात चालू असला तरी पक्ष शरद पवारच्या हातून कधी निसटून जाईल आणि अजित पवार कधी पक्षाचे अध्यक्ष होवून जातील याचाही काही नेम नाही,अशी अवस्था राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची झाली आहे. धरलं तर चवतो अन सोडलं तर पळतो,अशी सध्या शरद पवार यांची गत झाली आहे,कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली,तेव्हा शरद पवारांचे विश्वासू सोबत होते परंतु जे साहेबांचे विश्वासू होते,तेच आज अजित पवाराचे विश्वासू बनले आहेत म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर अजित पवारांचे वर्चस्व आहेत,हे यावरून सिद्ध होतोय.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या