Ad Code

Responsive Advertisement

अखेर,राज्यातही शिवसेना संपली



अखेर,राज्यातही शिवसेना संपली

शिवसेनेचा वाद न्यायालयात असून,आता आपआपल्या पटीने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न दोन्ही गट करीत आहेत. शिवसेनेचे सर्वच्या सर्वच आमदार अपात्र होतील असा,युक्तिवाद सुरू झाला आहे. म्हणजे शिवसेना संपली,निस्तनाबूत झाली असंच म्हणावं लागेल. मग ती उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो.

आमदार अपात्रता


  • आपआपल्या दाव्यावर दोन्ही गट ठाम

मागील एक-दिड वर्षापासून शिवसेनेचे आमदार अपात्रतेचा वाद न्यायालयात सुरू असून ती समीप घटिका आता जवळ आलेली असंच म्हणावं लागेल. आम्ही अपात्रतेचा मुद्दा घेऊन शिवसेनेच्या दोन्ही गटाने दावे-प्रतिदावे सुरू झाले असून,यात आपलाच विजय होईल असं प्रत्येक गटाला वाटायला लागले. आपलाच गट खऱ्या शिवसेनेचा मानकरी आहे,हे देशाला दाखवून देण्याच्या देखील प्रयत्न करण्यात येत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात तसं राजकीय पुढारी पटाईत आहेत,हे सांगण्याची गरज नाही. तरीपण युक्तिवाद करीत असतांना आपलाच गट सरस आहे,हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून,खरी शिवसेना कुणाची यावर राज्यातील जनता देखील चातकांप्रमाणे असुसलेली आहे,हे ही तितकच खरं आहे.

शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आमदार अपात्रतेचा मुद्दा लावून धरला जात असून. आपलाच गट सरस आहे,हे सुद्धा दोन्ही गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करतांना दिसत आहे. आता शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र होतील,हे येणारा काळच सांगेल. तरीपण शिवसेनेचे दोन्ही गट आपआपल्या दाव्यावर ठाम आहेत.

आमदार अपात्रता

  • शिंदे गटाचे १६ आमदार

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदावर कार्य करीत असतांना,आताचे मुखमंत्री एकनाथ शिंदे पक्षा अंतर्गत बंडाळी घेतली आणि शिवसेनेच्या ४० आमदारांना आपल्या सोबत घेऊन भाजपा सोबत युती करीत राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले अन तेव्हा उद्धव ठाकरेच्या शिवसेनेची न्यायालयीन लढाई सुरू झाली,असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि एकनाथ शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र असल्याचा युक्तिवाद सुरू आहे.

वास्तविक हे १६ आमदार अपात्रतेचा मुद्दा इतक्या दिवस निकालविना पुढे चाल-ढकलं करीत होते. हे खरं तर चूक होती,ते १६ आमदार दोषी असतील तर अपात्र व्हायला पाहिजे होते आणि दोषी नसतील तर अपात्र नाहीत असं सांगून मोकळे व्हायला पाहिजे होते पण तसं न होता हे आमदार अपात्रतेचा मुद्दा पुढे-पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू होता,अन हे सत्य आहे. चूक असेल,तर चूक असं म्हणायला विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणायला तयार नव्हते,म्हणजे काय कारण होते हे सुद्धा समजायला मार्ग नव्हता म्हणजे इथे तारीख पे तारीख,असलाच प्रकार सुरू होता.

आणखी वाचा : कायदा माझ्या खिशात हिच सरकारची नीत

  • तर शिवसेनेचे सर्वच आमदार अपात्र

आता राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचा असं म्हणन आहे की,पक्षाची रचना घटना विरोधी आहे मग शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच नेता म्हणून एकनाथ शिंदेची निवड केली होती आणि त्याच घटनाविरोधी पक्ष रचनेचे एकनाथ शिंदे हे लाभार्थी आहेत. समजा पक्ष रचना घटनाविरोधी असल्याचा दावा आपण एकनाथ शिंदे करीत आहेत आणि आपण तो मान्य केला तर मग शिवसेनेच्या सर्वच आमदारांचे निलंबन करावे लागेल,म्हणजेच शिवसेनेचे सर्वच आमदार अपात्र होतील. 


कारण काय ? तर त्याच घटनाविरोधी पक्षाच्या नेतृत्वात निवडणुका लढवून ते शिंदे गटातील सर्वच आमदार झाले आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दावा मान्य करणार,म्हटल्यावर शिवसेनेच्या सर्वच आमदारांना अपात्र घोषित करावं लागेल याचा अर्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा खोटा आहे,असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वकील देवदत्त कामंत यांचे म्हणने आहे.म्हणून शिंदे गटाचे आमदार अपात्र व्हायलाच पाहिजेत म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या