Ad Code

Responsive Advertisement

ग्रामीण भागांतील घरकुलांना वाढीव निधी देण्यात यावा,लाभार्थ्यांची मागणी



ग्रामीण भागांतील घरकुलांना वाढीव निधी देण्यात यावा,लाभार्थ्यांची मागणी

शासनाने गरीब व्यक्तींना स्वताचे घर बांधकाम करण्यासाठी घरकुल योजना अमलात आणून गरीब जनतेला पूर्णपणे दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला असून लाभार्थ्यांच्या मनात सुखंकर भावना निर्माण करून आशेचं किरण जगविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला,यात शंका नाही. परंतु शहरी आणि ग्रामीण भाग असे दोन भागांचा विभाजन करून घरकुल निधी वाटपात ग्रामीण भागातील जनतेवर थोडासा शासनाने अन्याय केलेला असून,ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना निधी वाढवून देण्यात यावी अशीच अपेक्षा घरकुल लाभार्थी करत आहेत,

घरकुल योजना


  • ग्रामीण भाग आणि शहरी भाग

शासनाने घरकुल योजना अमलात आणून गरीब-गरजू जनतेला दिलासा देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि घरकुल योजणेमुळे होतकरू लाभार्थ्यांना त्याचा लाभ होतांना दिसतो आहे परंतु घरकुल योजना शासनाने दोन विभागत विभाजन करून निधी वाटपात ग्रामीण भागातील जनतेवर थोडासा शासनाने अन्याय केलेला आहे,असं माझं मत आहे. कारण शहरी भागांतील लाभार्थ्यांना वेगळा निधी अन ग्रामीण भागांतील लाभार्थ्यांना वेगळा निधी,असं नको व्हायला पाहिजे होतं. शहरी भागातील घरकुल लाभार्थ्यांना जो निधी शासनाकडून देण्यात येत आहे त्याला आम्हचा अजिबात विरोध नाही तो निधी त्यांना मिळायलच पाहिजे अन त्याचे आम्ही समर्थनच करतो परंतु ग्रामीण भागांतील घरकुल लाभार्थ्यांना जो निधी शासनाने ठरवून दिलेला आहे,त्याला आम्ही विरोध करतो आहोत कारण काय तर शहरी भागांतील लाभार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागांतील लाभार्थ्यांना जो काही शासनाने निधी वाटप करीत आहेत त्यावर विचार करून निधी वाढवून मिळायला पाहिजे,हिच आम्हची आणि ग्रामीण भागांतील घरकुल लाभार्थ्यांची आग्रहाची मागणी आहे.

आणखी वाचा : घरकुल योजना २०२३ ची यादी जाहीर,बघा तुमच्या गावाची यादी तुमच्या मोबईलवर
 घरकुल योजना ही केंद्र सरकारची योजना असून सन १९९५-१९९६ पासून कार्यरत आहे,सध्या या योजनेचे शहरी आणि ग्रामीण असे दोन भागात विभाजन करण्यात आलेले आहे,त्यानुसार शहरी भागातील लाभार्थ्यांना प्रत्येक घरामागे जवळपास २.५ लाख अनुदान देण्यात येते आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना प्रत्येक घरामागे जवळपास १.३ लाख ते २ लाखांचे अनुदान देण्यात येते. 

 आज महागाई आकाशाला भिडली असतांना शासनाने घरकुल लाभार्थ्यांन करिता मंजूर निधी अपुरा होत असून मिळालेल्या निधी मधून लाभार्थी घर निर्माण करूच शकत नाही,ही खरी वस्तुस्थिती आहे कारण जि स्पर्धा शहरी भागात होती ती आता ग्रामीण भागात सुद्धा निर्माण झालेली आहे. लोखंड,रेती,विटा,मजुरी,सीमेंट हे जे काही घर बांधकामासाठी लागणारे साहित्य आहेत ते शहरी भागांपाठोपाठ ग्रामीण भागात सुद्धा त्याच दराने खरेदी करावे लागत असून,घरकुल लाभार्थ्यांची दमछाक होतांना दिसून येते आणि यामुळे कित्येक लाभार्थ्यांचे स्वताचे घर बांधण्याचे स्वप्न अधुरे राहतात आणि हे वास्तव्य आहे.

घरकुल योजना


म्हणून शासनाने घरकुल योजनेतील जे काही निकष आहेत ते शितील करून मिळणारा निधी वाढवून देण्यात यावा,जेणेकरून गरीब,वंचित शोषित,कामगार आणि शेतकरी मजूर योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यास पात्र ठरेल आणि शहरी भागा पाठोपाठ ग्रामीण भागातील लाभार्थी सुद्धा हक्काचं घर बनवून वास्तव्य करू शकेल आणि शासनाने मला माझ्या हक्काचं घर बांधून दिले,याचा सार्थ अभिमान बाळगेल.

  • वाढीव निधी मिळायलाच पाहिजे 

शासनाने घरकुल योजनेत जि काही निधीची तरतूद केलेली आहे तो निधी अपुरा [पडतो यांची पूर्ण कल्पना घरकुल लाभार्थ्यांना आहे आणि त्यामुळेच घर बांधकाम करतेवेळी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीतून घर पूर्ण होत नसतांना आपल्या डोक्यावर छत असावं म्हणून सावकाराकडून किंवा आपल्याकडील असलेल्या वस्तु विकून एकेक पैसा गोळा करतांना दिसून येतो आणि जे काही बाहेरून पैसे गोळा करतो तेव्हा बऱ्याचदा लाभार्थ्यांची दमछाक होते किंवा त्यांनी केलेले प्रयत्न अपुरे पडतात आणि बांधकाम करण्याचे स्वप्न धुळीस मिळले जातात आणि हे सर्व सत्य आहे.

आणखी वाचा : मूळ लाभार्थी वंचित,निधी मात्र फस्त...

ग्रामीण भागांतील घरकुलांना वाढीव दर मिळावा म्हणून माय-बाप सरकार गरीब-गरजू घरकुल लाभार्थ्यांना जि काही निधी मंजूर आहे त्यापेक्षाही जास्त निधीची गरज असून तो निधी शहरी भागा पाठोपाठ ग्रामीण भागांतील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा,हिच माझी कळकळीची विनंती.

घरकुल योजना



शासनाचे गरीब जनतेविषयी घरकुलाचे उदिष्ट सुंदर असून जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना याचा लाभ घेता यावा हेच यातून सिद्ध होत आहे परंतु घरकुल योजनेतील नियम शिथिल करून भरीव निधी उपलब्ध करून होतकरू जनतेला शासनाने सहकार्य करावा हिच नम्र विनंती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या