Ad Code

Responsive Advertisement

वावर आहे तर पॉवर आहे

वावर आहे तर पॉवर आहे

आता सध्या मुला मुलीचे लग्न पक्क करण्यावर आईवडीलांचा या महीन्यात जास्त भर असतो. परंतु मुलीचे लग्न जुडवीतांना आई वडीलांनी थोडी काळजी घेउनच कार्यक्रम पार पाडावा, कारण मुलीचे आईवडील शेती विकून मुलीच लग्न करु नयेत, आपल्या, संस्कृतीचा विचार करुण, साध्या-सुध्या पद्धतीने रितीरीवाज बाळगूण कमी खर्चात लग्न समारंभ आटोपूण घ्यावे हिच बहुजन समाजाला माझी कळकळीची विनंती.

लग्न

  • मुलीचे लग्न अन आई वडील.
आपल्या मुलीचे लग्न थाटामाठात व्हायला पाहिजे असं आता सामान्य माणसाला देखील वाटायला लागले आहे आणि थाटामाठांचा जरी विचार केला तर आपल्या बहुजन समाजातील सामान्य माणसाचे काय हाल होतील,याची कल्पना ना केलेली बरी कारण बहुजन समाजातील बरेच लोक आपली उपजीविका शेतीचा व्यवसाय करून करतात तर काही लोक मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवतात. जो तो आपआपल्या परीने उपजीविकेचा साधन माणुन उपजीविका भागवतात.

श्रीमंत समाजाचा हेवेदावा न करता आपल्या मुलामुलींचे लग्न साध्या पद्धतीत आपल्या रितीरिवाजा प्रमाणे साजरा करावा कारण काय तर आपल्या समाजाकडे फारशी सरकारी नौकरी नाही किंवा मोठे व्यवसाय नाही त्यामुळेच मुलामुलींचे लग्न करतांना जरा काळजी घेऊनच लग्न करावे आणि लग्नावर होणारा अवाढव्य खर्चाचा विचार करावा. अवाढव्य खर्च करून डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करण्यापेक्षा बिन कर्जाचा व्यवहार करून लग्न समारंभ आटोपून घ्यावे. हिच बहुजन समाजाला कळकळीची विनंती.
लग्न


  • वावर आहे तर पॉवर आहे
आपल्या मुलामुलींचे लग्न अवश्य करा,त्याला कुणाचाही विरोध असणार नाही ती आपली कर्तव्य आहेत परंतु कर्तव्य पार पडतांना थोडा शहाणपणा शिखणं सुद्धा तितकच महत्वाचा विषय आहे कारण बहुजन समाजात जास्तीत जास्त लोक शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांची व्यथा,शेतकऱ्यांची परीस्थिति सर्वानाच ठावूक आहे म्हणूनच मुलामुलींच्या आई वडिलांना मुलीच्या लग्न थाटामाठात न करता आपल्या रितीरिवाजा प्रमाणे अत्यंत साध्या पद्धतीने करावा. कारण,आज काल निसर्गाच्या लहरिपणामुळे शेतीचा व्यवसाय न परवडणारा व्यवसाय होऊन गेलेला असून,खर्च जास्त अन नफा कमी अशी परिस्थिति प्रत्येक शेतकऱ्यावर आलेली आहे अन आजच्या वाढत्या महागाईमुळे तर काही विचाराची सोय राहिली नाही,म्हणून मुलीचे लग्न उरकतांना थोडा विचार करूनच करावा.




शेतकऱ्यांचा नाद कुणीच करू शकणार नाही आणि हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. परंतु वावर आहे तर पॉवर आहे,असं म्हणायला सोपं वाटतो परंतु प्रत्यक्ष कृती करतांना कपाळावर थोडी अटी पडते. म्हणून शेतकरी माय-बापांनो मुलीचे लग्न करतांना जरा शांत डोक्याने विचार करा अन मुलीच्या लग्नाला कर्जबाजारी न होता किंवा आपल्या कडे असणारी शेती जमीन-जुमला कुठं गहाण न ठेवता किंवा परस्पर शेतीची विक्री न करता आपल्या मुलीचे लग्न कमी खर्चात अन साध्या पद्धतीत आपल्या रितीरिवाजा प्रमाणे उरकण्याचा प्रयत्न करा.

आणखी वाचा : 
मराठा गडी,कशाचा धनी

आता कित्येक मुलीच्या वडिलांना लग्नात खूप खर्च करावा लागतो. जसा मुलीच्या वडिलांना खर्च लागतो तसाच मुलाच्या वडिलांना देखील खर्च लागतो,हेही तितकेच सत्य आहे. म्हणून दोन्ही पार्टींनी आपआपल्या परिस्थितीनचा विचार करूनच लग्न समारंभ उरकण्याचा प्रयत्न करावा,कारण लग्न समारंभात कितीही खर्च केलात त्रि तुम्हाला कोणीच पारितोषिक देणार नाहीत,उलट तुम्हच्या चुका शोधण्याचाच प्रयत्न करत राहतील अन हे सत्य आहे.

लग्नात आल्यावर पोठभर आधी खावून घेतील अन खाऊन झाल्यावर मग नावे ठेवायला तयार राहतील. भाजी बिघडली होती,जिलेबी बरोबर नव्हती,पोळी करपली होती,भात पिटला होता,अशी असंख्य उदाहरणे देता येतील ,कारण नावबोटे ठेवणे ,ही आपल्या बहुजन समाजाला लागलेली अत्यंत खराब कीड आहे आणि ही कीड बाजूला काढून फेकल्याशिवाय समाजात सुधारणा होणार नाही. म्हणून माझे मायबाप हो तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की,मुलामुलींचे लग्न समारंभात अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडा. जमीन-जुमला न विकता किंवा कर्जबाजारी न होता लग्न समारंभ उरकून घ्यावे नाहीतर मुलीच्या वरातीसोबत आईवडिलांची वरात निघाल्या शिवाय राहणार नाही,एवढं मात्र नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या