Ad Code

Responsive Advertisement

सेमिफायनल भाजप जिंकले,फायनल आम्हीच जिंकू, कॉँग्रेसचा निर्धार



सेमिफायनल भाजप  जिंकले,फायनल आम्हीच जिंकू,
कॉँग्रेसचा निर्धार 

राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्याचे निकाल घोषित होवून भारतीय जनता पक्षाला तिन्ही राज्यांमध्ये स्पष्ट बहुमताचा कौल मिळाला असला,तरी पण हे सेमीफायनल आहे,फायनल पुन्हा बाकी आहे आणि फायनल भारतीय जनता पक्षाला जिंकता येणार नाही,असं मा. शरद पवार यांच भाकीत आहे.
निवडणुका


  • भाजप आणि तीन राज्य

कालच्या मतमोजणी वरून राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्याने भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमताने विधानसभेच्या निवडणुका जिंकता आलेल्या असून. मध्यप्रदेश वगळता छत्तीसगढ आणि राजस्थान या दोन्ही राज्यात कॉंग्रेसचा पानिपत करण्यात भाजपा वरचढ ठरला आहे,कारण या दोन्ही राज्यात कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती,ति आता पुन्हा भाजपाकडे खेचण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या अथक परिश्रमामुळे ते सिद्ध करून दाखविले,असंच म्हणावं लागेल.

वास्तविक राजस्थान राज्याचे निवडणुकीचे कौल पूर्णपणे भाजपाच्या बाजूने होते,हे सत्य आहे कारण दर पाच वर्षानी राजस्थान चे सरकार बदलत राहतात परंतु मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ हे दोन्ही राज्य भारतीय कॉंग्रेस कडे वळविण्यात कॉंग्रेस नेते यशस्वी होतील असा अंदाज होता परंतु त्या अंदाजाला तिलांजलि देत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते कुठं कमी पडले ह्याचा शोध घेणे म्हणजे आत्मचिंतन करून पाहणे खूपच गरजेचे आहे आणि भाजपाचे राष्ट्रीय नेते कोणत्या पद्धतीने कॉंग्रेस नेत्यांवर वरचढ ठरले,ह्याही गोष्टीचे चिंतन करणं आहे,म्हणजे कॉंग्रेस पक्षाची कोणती चूक झाली,हे लक्षात येईल. आरोप-प्रत्यारोप करून वेळ वाया घालविन्यापेक्षा आपलं कुठं चुकलं यावर लक्ष केंद्रित करणं,कॉंग्रेस पक्षाला अत्यंत निखरीचे आहे.

निवडणुका


मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या दोन्ही राज्यात निवडणुकी आधी वातावरण हा भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने दिसत होता आणि या दोन्ही राज्यात कॉंग्रेस पक्षाची सत्ता येईल,असं अंदाज वर्तवला जात होता,परंतु निवडणुका पार पडून निकाल भाजपाच्या बाजूने लागला,हे अचंबित करणारा प्रकार घडला म्हणून आपलं कुठं चुकलं आणि आम्ही कुठं मागे पडलो या गोष्टीचे मनन करणे खूपच गरजेचे आहे,अन्यथा कॉंग्रेस पक्षाची काय परिस्थितीत होणार ? हे सांगता येणार नाही.

  • भारत आणि इंडिया आमणे-सामने

राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारत एक हाती सत्ता मिळवून कॉंग्रेस पक्षाला चारी मुंड्या चित करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे म्हणजे मागच्या काही दिवसात जो वाद होता,भाजप आणि इंडियाच्या या वादात सध्यातरी भाजप जिंकला आहे,असंच म्हणावं लागेल. पाच राज्यांच्या निवडणुकीत चार पैकी फक्त तेलंगना राज्य एकमेव इंडियाला जिंकता आला,असंच म्हणावं लागेल कारण या संपूर्ण राज्यात जे कॉँग्रेसला जिंकता आले असते तर इंडिया जिंकली असा,सरळ-सरळ अर्थ निगाला असता पण इथे तीन राज्य भाजपने जिंकले म्हणजे भाजप जिंकला असा त्याचा अर्थ होतो.

आणखी वाचा :इंडिया विरुद्ध भारत  

तेलंगना राज्यात केसीआर च्या चारही मुंड्या चित करीत कॉंग्रेस पक्षाने सत्ता मिळवली,याचा अर्थ कॉंग्रेस पक्ष तेलंगाना राज्यात जास्त जोर लावला अन बाकीच्या राज्यात नाही,असं होत नाही,बाकीच्या राज्यात सुद्धा कॉंग्रेस पक्षाने पूर्णपणे ताकद लावली परंतु तेलंगाना राज्यात कॉंग्रेस पक्षाचा प्रतिस्पर्धी केवळ केसीआर सरकार होता पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते म्हणून कॉंग्रेस पक्षाला तेलंगाना राज्यात सत्ता मिळवता आली आणि राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यात कॉंग्रेस पक्षाचा प्रतिस्पर्धी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते,आणि मोदी सरकारच्या पुढे कॉंग्रेस पक्ष हा तग धरू ण शकल्यामुळे वातावरण अनुकूल असून सुद्धा मोदीच्या समोर हे राज्य कॉंग्रेस पक्षाला गमवावे लागले,ही खरी परिस्थितीत आहे आणि कॉंग्रेस पक्ष सुद्धा हे सत्य नाकारू शकत नाही.

  •  सेमीफायनल ते जिंकले,फायनल आम्हीच जिंकू

राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला भरभरून यश संपादन करता आला असला तरी हे सेमीफायनल आहे आणि समोर येणारी निवडणूक ही लोकसभेची असल्यामुळे ती फायनल निवडणूक असून,ती फायनल आम्हीच जिंकू,मोदीला फायनल जिंकू देणार नाही,असा इंडिया आघाडीचा भाकीत आहे.
निवडणुका


 जसा क्रिकेट च्या सामन्यात भारत संघ दहा सामने जिंकला परंतु शेवटचा सामना भारत हरला अगदी त्याच प्रकारे दहा विधानसभेच्या निवडणुका जरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकले असतील तरी पण लोकसभेची निवडणूक ही फायनल निवडणूक असून अंतिम सामना आम्हीच जिंकणार असा अंदाज इंडिया आघाडीने लावला असून समोर बघू कोण जिंकते ? अन कोण हरतो ?



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या