Ad Code

Responsive Advertisement

शेतकरी संपावर गेले तर



शेतकरी संपावर गेले तर.......

राज्यातील सर्वच कर्मचारी संघटनांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे औचित्य साधून संप पुकारलेला आहे. प्रत्येक कर्मचारी आपआपली मागणी पुढे रेटत जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला आपला विरोध नाही परंतु एकमेकांचे हेवेदावे समोर करूनच ज्या-त्या कर्मचारी संघटना संप पुकारत आहेत आणि त्याला अपवाद आता राज्यातील तहशीलदार सुद्धा नाहीत.

शेतकरी


स्वताची आणि कुटुंबाची लाईलाई होत असतांना किंवा पोटभर सुद्धा मिळत नसतांना माझा बळीराजा,जगाचा पोशिंदा रासायनिक खते,बि-बियाने,औषधी,मशनरीवरील वाढलेला खर्च यांचा हिशोब करून शेतकरी सुद्धा संप पुकारू शकतो परंतु शेतकरी कधी संपावर जातांना दिसेल का ? किंवा कधी संप पुकारला का ? कधीच नाही आणि असला घाणेरडा विचार शेतकऱ्यांच्या रक्तात नाही अन असला विचार माझा शेतकरी राजा करणार सुद्धा नाही कारण शेतकऱ्यांची औलाद आहे,सर्व सहन करण्याची क्षमता देखील रक्ता-रक्तात भिनली आहे. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे,इडा-पिडा जाऊ दे अन बळिराजाचे राज्य येवू डे,ही माझ्या शिवरायांची संकल्पना होती,म्हणून शेतकरी कधीच संप पुकारणार नाही.

  • जर शेतकरी संपावर गेला तर..

शेती व्यवसायाला निगडीत जसे रासायनिक खते,बि-बियाणे,किटकनाशक किंवा शेती उपयोगी नवनवीन उपकरणे यांच्या किमती आजच्या घडीला गगनाला भिडले आहे आणि महागाईच्या काळात शेती न परवडणारा व्यवसाय झाला परंतु या महागाईच्या चटका बळिराज्याला बसत नाही,अशातला भाग नाही. महागाईचा चटका बळिराज्याला नेहमी बसत आहे परंतु महागाईचे चटके खाऊ-खाऊ शेतकरी लोखंडा पेक्षाही जास्त मजबूत होवून गेलाय,आणि हे वास्तव्य आहे तरी पण कधी महागाई विरोधात कुणासमोर गुडघे टेकले नाहीत किंवा कधी लाचारपणा पत्करला नाही. महागाईचा भस्मासुर बोकाळतोय हे माहीत असतांना सुद्धा प्रत्येक वर्षी जोमाने शेतीची मशागत करून कामाला लागतोय.

शेतकरी


शेतकरी हा निसर्गावर प्रेम करणारा निसर्गाच्या भरोशावर जीवन जगणारा किडा होऊन गेलेला आहे. जमिनीवर सरपटणाऱ्य किडया पेक्षा आकाशातून उडणाऱ्या चंडोलाला खुल्या मनाने जग पाहता येतो पण माझा जमीनितला किडा यातच धन्यता माणुन शेतीतल्या मातीतच जास्त रमून जातो. शेती करीत असतांना कित्येकदा व्यापारी वर्गाकडून अपमानित सुद्धा होतो. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची टिंगल टवाळखी सुद्धा करतात पण त्याला भिख न घालता स्वाभिमानाने जीवन जगत पुन्हा शेतीतल्या मातीतच रमून जातो. व्यापाऱ्याचे सोडा परंतु त्या व्यापाऱ्याचा तो तीन पैशांचा नौकर (दिवांजी) तो सुद्धा शेतकऱ्यांना अपमानित करून सोडतो पण त्या तीन पैशाच्या नौकराला भीक घालेल इतका दुबळा,कर्तव्यशून्य माझा शेतकरी नाही,येरे माझ्या मागल्या,म्हणत पुन्हा येवून मातीतच रमतो.

या दोन वर्षाअगोदर देशावर कोरोंनासारख्या महामारीचे संकट उभे झाले सर्व व्यवसाय ठप्प झाले. कारखानदारी सुद्धा मजूरांअभावी बंद अवस्थेत होत्या परंतु त्या हि महामारीत स्वताला आणि देशाला सावरला आणि सवरला तो म्हणजे फक्त शेतकरी. साऱ्या जगानी उघड्या डोळ्यांनी भीषण महामारी अनुभवली,ती कुणालाच सांगायची गरज नाही तरीपण मुद्दाम म्हणून सांगावे लागेल,त्या महामारीच्या संकटात व्यापार थांबला,कारखानदारी थांबली आणि इतकच नाही तर देशातील नोकर व्यवस्था सुद्धा थांबली परंतु साऱ्या देशात लॉकडाऊन असून सुद्धा फक्त एकच कारखाना अविरत सुरू राहिला आणि तो कारखाना म्हणजे माझा शेतकरी.

 त्यावेळी जर शेतकरी थांबला असता तर देशात हाहाकार माजला असता अन हे सांगायला कुण्या भविष्यवेत्याची गरज पडणार नाही आणि जिथं शेतकरी थांबतो तिथं जगाला थांबायला भाग पाडतो,इतकी भयान ताकद बळिराज्याच्या मनगटात आहे पण या गोष्टीच कधी बाऊं करणार नाही किंवा या गोष्टीचा गर्व बाळगणार नाही आणि जिथं गर्व बाळगला जातो तो शेतकरी नाही. किती वाटतो आनंद या झोपडीत माझ्या म्हणणारा माझा शेतकरी सदा-सर्वदा दुख लपवून खुश दाखविण्याचा प्रयत्न करतो.
शेतकरी


संप शेतकऱ्यांना सुद्धा पुकारता येतो आणि जर का शेतकरी संपावर गेला तर देशात हाहाकार माजेल. देशाला अन्नधान्य मिळणं कठीण होवून जाईल अन सर्व श्रीमंत लोक किंवा नोकरदार वर्ग पैसे खाऊन जगणार नाही तर त्यांना शेतकऱ्यांच्या शेतात पिकवीलेलाच अन्नधान्य खाल्या शिवाय गत्यंतर उरणार नाही,अन हे वास्तव्य आहे आणि सूर्यप्रकाशा इतके सत्य देखील आहे.

परंतु शेतकरी कितीही अडचणीत आला तरी संप पुकारणार नाही कारण तो देशाचा अन्नदाता आहे,जगाचा पोशिंदा आहे आणि मि आधीच सांगितल आहे की,संप पुकारणं शेतकऱ्यांच्या रक्तातच नाही,फक्त सांगायच इतकच आहे की. देशातील सरकारने. देशातील उद्योगपतीने,देशातील कारखानदाराने किंवा देशातील नोकरदार वर्गाने शेतकऱ्यांना दुबळा समजू नका,लाचार समजू नका किंवा कर्तव्यशून्य समजू नका,हिच कळकळीची नम्र विनंती.

आणखी वाचा :भडका ऊसदर आंदोलनाचा! कारखानदारांच्या विरोधात हजारो आंदोलक शेतकरी रस्त्यावर, संघर्ष अटळ
देशातील शेतकरी गरीब आहे आणि तितकाच प्रामाणिक आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव,बारमाही वीज,बारमाही नहराचं पाणी जर मिळालं असतं तर देशातील शेतकरी सुजलाम-सुफलाम झाला असता परंतु या देशातील राज्यकर्त्यांना शेतकरी सुखी झालेला बघवत नसेल किंवा देशातील शेतकरी हा फाटकाच असायला पाहिजे,अशी राजकीय पुढाऱ्यांची महत्वकांक्षा असेल असं म्हणायला हरकत नाही आणि असल्या प्रकारच्या सुख-सुविधा जर शेतकऱ्याला मिळत गेल्या असत्य तर नक्कीच या देशातील शेतकरी सुजलाम-सुफलाम झाला असता,हे तितकच सत्य आहे.

शेतकरी

देशातील शेतकरी महागाईने आजच्या घडीला बेजार झाला आहे आणि शेती व्यवसाय हा न परवडणारा व्यवसाय झाला आहे कारण लागत जास्त लावली जात आहे आणि येणारी आवक कमी झालेली आहे. त्यातच निसर्गाच्या लहरिपणामुळे येणारा अवकाळी पाऊस किंवा वातावरण बदलामुळे निर्माण होणारी रोगराई यात शेतकरी अर्धा-अधिक बुडून गेलाय परंतु माझा शेतकरी राजा खचून गेलेला नाही आणि भविष्यात कधी खचणारही नाही कारण तो जगाचा पोशिंदा आहे आणि जगाचा पोशिंदा राहिलच यात दुमत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या