Ad Code

Responsive Advertisement

ब्रिटिश काळापासून,महसूल विभागातील कोतवाल आजही जगतोय उपेक्षितपणाचे जीवन


ब्रिटिश काळापासून,महसूल विभागातील कोतवाल आजही जगतोय उपेक्षितपणाचे जीवन 

महसूल विभागातील तलाटी साझ्यावर काम करणारा शासनाचा छोटासा पण महत्वाचा कर्मचारी अन तो म्हणजे कोतवाल. तलाटी साझ्यावरचा तसा महत्वाचा कणा,कारण काय तर तलाटी ऑफिस साफ-सफाई करण्यापासून ते शेतकरी राज्याची मर्जी सांभाळण्यापर्यंतची जबाबदारी कोतवालची अन इतकच नाही तर अल्पशा मानधनात २४ तास नौकरी त्यामध्ये रात्र पाळीची ड्यूटि सुद्धा कोतवालची लावल्या जाते.
कोतवाल


कोतवाल पद तसं ब्रिटिश अखत्यारीतील निर्माण झालेला पद आहे आणि तेव्हा पासून बिचारा कोतवाल प्रामाणिक अन नित्य-नियमाने आपली सेवा बजावतांना दिसतो आहे आणि तो निमूटपणे आपले कर्तव्य बजावत आहे कारण काय तर फक्त चतुर्थ श्रेणी मिळावी एवढीच अपेक्षा. म्हणजे विचार करा कोतवाल पद हा इंग्रजांच्या कारकिर्दीत निर्माण झालेला पद आहे अन ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंतचा जरी विचार केला तर कोतवाल पदामध्ये फारशी काही तफावत दिसून येत नाही.

आपल्या अल्पशा मानधनात २४ तास नौकरी सांभाळतो,म्हणजे कधी-कधी कोतवाल पदाबाबत असाही विचार कित्येकांना येत असेल की,कोतवाल २४ तास नौकरी कसा काय करतो ? परंतु कोतवाल २४ तास नौकरी करतो हे फार कमी लोकांना माहीत असेल परंतु हे सत्य आहे. दिवसा तलाटी साझ्यावर आपली जबाबदारी सांभाळून तो रात्र पाळीमध्ये तालुक्याच्या तहशील ऑफिस वर जाऊन आपले कर्तव्य बजावतो,मग आता विचार करा तलाटी साझ्यावर कर्तव्य बजावणारा लहानसा कर्मचारी म्हणून विभागात किती महत्वाची दुवा आहे.
कोतवाल

नित्यनियमाने आणि प्रामाणिक पणाने आपले कर्तव्य बजावणारा कोतवाल हा इतक्या पुरताच मर्यादित आहे,असं नाही. निवडणूक आली की हाच कोतवाल बिएलओ (BLO) म्हणून काम करतांना दिसतो अती पाऊसामुळे पुरा सारखी परिस्थिती निर्माण झाली की हाच कोतवाल त्यावेळेवर चौकीदार म्हणून कर्तव्य बजवतांना नजरेस पडेल. अतिवृष्टी झाली की परत त्या भागांचे पंचनामे करायला सिद्ध असतो. इतकच नाही तर रेती वाहतूक म्हणजे रेती चोरीला जाऊ नये म्हणून गौण खनिजाचे रक्षण करतो कशासाठी तर शासनाकडून चतुर्थ श्रेणी मिळावी म्हणून.

वास्तविक महसूल विभागात सर्वच भूमिका चोखपणे निभावणारा हा बहुरंगी कर्मचारी असून या बहुरंगी कर्मचाऱ्याला चतुर्थ श्रेणी या आधीच मिळायला पाहिजे होती पण माशी कुठं शिंकली असेल किंवा आपले राज्यकर्ते उदाशिन धोरण अवलंबले असेल,अशीच शंका मनात कुजबूज करू लागते पण ते काहीही असो परंतु चतुर्थ श्रेणी मिळायलाच पाहिजे,हिच अपेक्षा राज्यातील कोतवाल पदावर काम करणारा व्यक्ति अपेक्षून आहे,हे मात्र सत्य आहे.

कोतवाल

महसूल विभागातील हा लहानसा कर्मचारी अन त्या लहान कर्मचाऱ्यावर जास्त अन्याय होतांना दिसून येतो आहे. आधी कोतवालाला वेतन लागू होती आणि वेतन लागू राहील याच आशाने कोतवाल पदावर काम करणारा व्यक्ति आशा बाळगून होता परंतु आले देवचीया मना,तेथे कोणाचे चालेना. या वाक्या प्रमाणे कोतवालाचे सुख कोणत्या राज्यकर्त्याला पहावले नसेल किंवा राज्यकर्त्यांच्या उदाशिन धोरणामुळे १९९०-९२ च्या काळात वेतन लागू असलेला कोतवाल पुन्हा मानधनावर आला,म्हणजे विचार करा किती अन्याय झाला असेल त्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीवर पण सोडलं तर पळतयं अन धरलं तर चावतोय अशी गत कोतवालाची झालेली आहे.

आणखी वाचा : शिक्षणात बहुजनांची गळचेपी....

महसूल विभागात काम करणारा बहुरंगी कर्मचारी कोतवाल अन यालाच आपल्या महाराष्ट्र राज्यात मानधन किती मिळतोय तर फक्त १५००० (पंधरा हजार) रुपये आहे आणि आपल्याच देशातील दुसऱ्या राज्यात या बहुरंगी कोतवालाला ४८ हजार ते ५० हजार मानधन आहे,मग विचार करा आपल्याच राज्यात प्रामाणिक पणाने कर्तव्य बजावणाऱ्य व्यक्तीला आपलेच सरकार समजून घेत नसतील तर कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा,असं म्हणायची वेळ राज्यातील कोतवाल पदांवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आलेली आहे,हे इथे कुतुहलाने नमूद करावे लागेल.

वास्तविक हे पद ब्रिटिश काळांपासून अस्तित्वात असल्यामुळे कोतवाल हा चतुर्थ श्रेणी या हक्काचा मानकरी ठरतो कारण काय तर जेव्हा पोलिस स्टेशन अस्तित्वात नव्हते तेव्हा कोतवाल पद अस्तित्वात आहेत परंतु कोतवाल हा पद उपेक्षितच आहे आणि अशा उपेक्षित कोटवालाला मूळ वेतनश्रेणी लागू करावी आणि चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा एवढीच अपेक्षा राज्यातील प्रत्येक कोतवाल बाळगुण आहे. एवढ्या महागाईच्या काळात इतक्या कमी अन तुटपुंज्या मानधनावर अविरतपणे कर्तव्य बजावणाऱ्य राज्यातील प्रत्येक कोटवालाला माझ्याकडून सलाम करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या